Women's Health esakal
health-fitness-wellness

Womens Health : 30 टक्के महिला करतात स्वतःच्या आरोग्यावर खर्च; शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे निरीक्षण

महिला सबलीकरणात आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचा घटक ठरतो. बऱ्याचदा अद्यापही अनेक महिला गृहिणी आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे माध्यम नाही.

नंदिनी नरेवाडी

प्रसूतीनंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. यातून लठ्ठपणा, ॲनिमिया असे विकार उद्‌भवतात.

कोल्हापूर : विविध क्षेत्रांत महिला यशस्वीपणे वावरत असल्या तरीही त्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे निरीक्षण शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने नोंदवले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स या सामाजिक शास्त्रात संशोधन करणाऱ्या संस्थेने शिवाजी विद्यापीठाला (Shivaji University) ‘महिलांचे पुनरोत्पादन आणि आरोग्य’ या विषयावर संशोधनासाठी निधी मंजूर केला होता.

या प्रकल्पांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये संशोधन केले. यामध्ये ३० टक्के महिलांनी (Women) आरोग्यासाठी पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले. महिला सबलीकरणात आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचा घटक ठरतो. बऱ्याचदा अद्यापही अनेक महिला गृहिणी आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे माध्यम नाही.

यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहेत. ही गोष्ट गृहीत धरली तरीही सर्वच क्षेत्रांतील महिला आरोग्यावर (Women's Health) स्वतःच खर्च करू शकतात का?, याबाबत सामाजिकशास्त्र विभागाने अभ्यास सुरू केला. यामध्ये त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील १८ ते ४५ वयोगटातील व शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, विद्यार्थिनी व व्यावसायिक महिलांना काही प्रश्‍नावली विचारली. या अभ्यासातून तीस टक्के महिलांनी आजारी पडल्यानंतर, तसेच आवश्यक शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च स्वतःच स्वतःच्या मर्जीने करत असल्याचे सांगितले. सत्तर टक्के महिलांनी पती किंवा घरच्या व्यक्तींवर अवलंबून असल्याचे नोंदविले.

अजून देखील महिला स्वतःच्या इच्छेने आरोग्यावर खर्च करू शकत नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य गरजेचे आहे.

-प्रतिभा देसाई, सहयोगी प्राध्यापिका, समाजशास्त्र

प्रसूतीनंतरच्या तपासण्या नाहीच

प्रसूतीनंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. यातून लठ्ठपणा, ॲनिमिया असे विकार उद्‌भवतात. मात्र, प्रसूतीनंतर तब्येतीची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. अशावेळी प्रसूतीनंतर मोठे आजार उद्‍भवू नयेत, यासाठी प्रसूतीनंतरच्या तपासण्या करून घेणे गरजेचे असते. या तपासण्या करून घेतल्या का, या प्रश्‍नाला सर्वांनीच नाही, असे उत्तर दिले. यातून प्रसूतीनंतर आरोग्याची काळजी महिलांनी घेणे गरजेचे असल्याचा निष्कर्षही त्यांनी मांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT