How To Get Rid Of Fat  
health-fitness-wellness

दिवसातून फक्त ३ वेळा खा! शरीरातले फॅट्स कमी करा

वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी लोकं विविध उपाय करतात

सकाळ डिजिटल टीम

आजकालच्या धावपळीच्या जगात वेळी अवेळी खाणे होते. बाहेरचे पदार्थ खूप खाल्ले जातात. अशावेळी शरीरातले फॅट्स (Fats)वाढतात. परिणामी वजनही वाढते. वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी लोकं विविध उपाय करतात. फॅट्स तसेच वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी कॅलरीजची भूमिका महत्वाची असते. तुम्ही दिवसातून किती वेळा खाता (diet) यालाही महत्व आहे. पण एक्सपर्टनुसार दिवसातून तीन वेळा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील फॅट्स तर कमी होतातच पर्यायाने वजनही कमी होते.

का खावे फक्त तीन वेळा( Health Benefits of Three Times Meal)

तीन वेळच्या जेवणात तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाचा (Food) समावेश होतो. अनेक लोकं दिवसातून फक्त तीन वेळाच खात असले तरी काहीजण पुन्हा पुन्हा म्हणजे सहा वेळा खातात. आपल्या जेवणाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आहारातून पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. याविषयी, आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉ अनुजा गौर म्हणाल्या की, बऱ्याच लोकांना थोड्या थोड्यावेळाने काहीतरी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते, असे वाटते. पण संशोधकांचे मत वेगळे आहे. तुम्ही जितके जास्त फायबर आणि प्रथिने खाल तितक्या लवकर तुमचे वजन नियंत्रणात राहील. तुम्ही जे खाता त्यावरून तुमचे वजन वाढणे किंवा कमी होणे यावर परिणाम होऊ शकतो.

अशाप्रकारे खाल्ल्याचे फायदे (Three Times Meal Benefit)

मधुमेहावर राहील नियंत्रण- दिवसातून तीन वेळा खाल्ल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. संशोधनानुसार, दिवसातून तीन वेळा खाण्याच्या तुलनेत जे लोक दिवसातून फक्त दोन वेळा खातात, त्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता न वगळता तो अवश्य करा.

कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण- कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच इतर कोणत्याही समस्या टाळायच्या असतील तर, दिवसातून तीन वेळाच खाण्याची सवय लावा. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा थेट परिणाम कोलेस्टेरॉलच्या पातळीवर होतो. पण आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थ खाल्ल्याने अधिक फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT