tips to keep away four disease in summer nagpur health news 
health-fitness-wellness

उन्हाळ्यात असतो 'या' चार आजारांचा धोका, अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. या दिवसात उन लागण्यासोबतच अनेक आजार होत असतात. जरासा बेजबाबदारपणा आपल्याला भारी पडू शकतो. अनेकजण उन्हातून आल्यानंतर थंड पदार्थाचे सेवन करतात. तसेच बाहेरून येताच थंड पाणी पितात. त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळ्यात उष्णता आणि ह्युमिडीटी वाढल्यामुळे अनेक आजार होतात. या ऋतूमध्ये होणारे आजार कोणते आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत? याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डिहायड्रेशनचा त्रास -
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेकांना डिहायड्रेशन होत असते. आपल्या शरीरात एक तृतीयांश भागात पाणी. ते घाम, लघवी अन् मलावाटे बाहेर पडते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त घाम जातो. त्यामुळे पाणी, शुगर आणि सोडीयमच्या प्रमाणामध्ये गडबड होते. नेहमी तुम्ही जितके पाणी पिता त्यापेक्षा जास्त पाणी उन्हाळ्याच्या दिवसात पीणे गरजेचे आहे. डिहायड्रेशन झालेच तर फार लवकर ठीक होते. मात्र, जास्तच झाले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

उपाय -
जास्त प्रमाणात पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, शिकंजी यासारख्या पदार्थांचे सेवन करा. तसेच मोठ्या प्रमाणात फळांचे सेवन करा. त्यामध्ये केळी, टरबूज, खरबूज, पपई, संत्री आदी फळांचा आहारात समावेश करा.

घामोऱ्या -

घामोऱ्या झाल्यानंतर आपल्या शरीराच्या काही भागावर कांटे असल्यासारखे जाणवते. लालसर जागेवर पुरळ उठते. तसेच खाज देखील सुटते. शरीरातील काही ठिकाणचे रोमछिद्ध बुजलेले असतील आणि त्याठिकाणाहून घाम निघायाला जागा नसेल तर हे होऊ शकतात. गरमी आणि ह्युमिडिटी असेल आणि जास्त टाईट कपडे घातले असेल तर घामोऱ्या होऊ शकतात. पाठ, पोटा, मान, छाती, कंबर आदी भागावर घामोऱ्या येतात.

उपाय -
उन्हाळ्याच्या दिवसात सूती कपडे परिधान करा. त्यामुळे त्वचा सुरक्षित राहण्यास मदत होईल. आंघोळ केल्यानंतर एकदम कपडे घालू नका. शरीराला व्यवस्थित कोरडे करा. तसेच नियमित पाण्याचे सेवन करा.

खराब जेवणामुळे होते फूड पॉझनिंग -
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता आणि ह्युमिडिटीमुळे बॅक्टेरिया, व्हायरस अन् फंगस वाढतात. तसेच हे रोगाणू वातावरणात वेगाने पसरून अन्न दूषित करतात. या दूषित अन्नाच्या सेवनामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. पोटात दुखणे, वारंवार उलटी येणे, डोकेदुखी, भूक कमी लागणे, लघवीमध्ये आग होणे आदी लक्षणे आहेत.

उपाय -
पालेभाज्या असतील किंवा फळ प्रत्येक वस्तू धुवून खायला पाहिजे. काहीही खाण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे. नॉनवेज खात असेल तर पूर्ण शिजवून खा. तसेच शिळे अन्न खाऊ नका. नेहमी ताजे अन्न खा.

टायफाईड -
दूषित पाणी पिणे आणि दुषित अन्नाचे सेवन करणे यामुळे टायफाईड होऊ शकतो. पचनयंत्रणा आणि ब्लडस्ट्रीमध्ये बॅक्टेरिया इंफेक्शनमुळे टायफाईड होतो. यामध्ये ताप असतो. तसेच भूख न लागणे, बॉडी पेन, कोरडा खोकला, डोकेदुखी, थंडी लागणे, आळस हे टायफाईडचे लक्षणे आहेत. 

उपाय -
टायफाईडपासून वाचण्यासाठी बाहेरचे अन्न खाऊ नका. उकळलेले पाणी प्या. तसेच अन्न नेहमी गरम करून खा. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. टायफाईडपासून बचाव करण्यासाठी वॅक्सीन देखील घेतले जाते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे कायद्यानुसार नाही! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल आणि सोनिया गांधींना दिलासा, EDच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

Fake Officer: ४ मैत्रिणी, ३ गरोदर, एक तर २० वर्षांची... पण तो IAS नव्हताच! अटकेनंतर धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांवर

BHC Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत मुंबई, नागपूर व संभाजीनगर खंडपीठात २,३३१ पदांची भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai News: खड्डेमुक्त रस्ते पुरवणे महापालिकांची जबाबदारी, उच्च न्यायालयाचे खडे बोल

SCROLL FOR NEXT