Vasundhara Talware Sakal
health-fitness-wellness

योगा लाइफस्टाइल : महर्षी पतंजलींची योगसूत्रे

आपण पुढील लेखांतून योगसूत्रांचा प्रवास जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी योगसूत्र म्हणजे काय आणि ते लिहिण्यामागचे प्रयोजन समजून घेऊयात.

वसुंधरा तलवारे

आपण पुढील लेखांतून योगसूत्रांचा प्रवास जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी योगसूत्र म्हणजे काय आणि ते लिहिण्यामागचे प्रयोजन समजून घेऊयात. सूत्र म्हणजे धागा. महर्षी पतंजलींनी एकूण १९६ योगसूत्रे धाग्याच्या रूपात लिहिली आहेत. जेणेकरून निरनिराळ्या पातळ्यांवर किंवा पायऱ्यांवर ती एकमेकांत गुंफता येतील. कोणतेही सूत्र सहा किंवा सात शब्दांपेक्षा मोठे नाही. ती सूत्र अत्यंत संक्षिप्त, अचूक आणि शक्तिशाली आहेत. पुराणकाळात आतासारखे पेन किंवा कागद उपलब्ध नव्हते. त्यावेळी ही सूत्रे गुरूकडून शिष्य किंवा अनुयायांना मुखोग्दाराद्वारे अगदी मनोभावे शिकविली जात. त्यामुळे ती अगदी संक्षिप्त आणि मुद्देसूद आहेत. ही १९६ सूत्रे योग जीवन जगण्याचा मार्ग असून ती तुम्हाला मुक्तिकडे घेऊन जातात, असे कैवल्य यांनी सांगून ठेवले आहे. आता पतंजलींचा विचार करू.

कोणताही गुरू प्रथमतः प्रगतिशील शिष्यावरच लक्ष केंद्रित करतो. यासाठी आपण ‘योग दर्शन’च्या पहिल्या चार पाठांचा विचार करूयात. त्याला समाधी पद म्हणूनही ओळखले जाते. समाधी अवस्था प्राप्त केलेल्या साधकांसाठी ते पाठ आहेत. परंतु समाधी अवस्थेला घाबरून जाऊन योगाचा विचार बारगळू देऊ नका. खूप साधना करणाऱ्यांसाठी समाधी ही अंतिम ध्येय आहे. या ध्येयाच्या मार्गावर अनेक सुंदर स्थळ आहेत, त्याचा आपण आपल्या सामान्य घरगुती जीवन जगण्याबरोबरच आनंद घेऊ शकतो. माझ्यासाठी म्हणाल, तर समाधी म्हणजे मनाला शांत करणारी अंतिम गोष्ट. आपल्यापैकी बहुतेकांना ते पटत असेलही.

पहिला पाठ आहे समाधी पद (पद म्हणजे पाऊल किंवा एक चतुर्थांश. सर्व सूत्रे चार पदांत लिहिली आहेत.) सर्व पदे योगा म्हणजे काय आणि त्याचे परिणाम, मन म्हणजे काय व आपण त्याला कसे शांत करू शकतो. समाधीचे विविध प्रकार, मुक्ती म्हणजे काय याचे सविस्तर विवेचन केले आहे.

दुसरा पाठ ‘साधना पद’ असून तो नवशिक्यांसाठी आहे. यामध्ये क्लेष या ताणाबद्दल विवेचन केले आहे. तो कसा कमी करायचा, विवेक कसा साधायचा, त्याचबरोबर योगाच्या अष्ट पदराच्या अंतरंगातील यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांची माहिती दिलेली आहे.

तिसरा पाठ ‘विभूती पद’ हा आहे. त्यामध्ये योगाच्या अष्ट पदरातील धरणा, ध्यान आणि समाधी या बहिर्गांवर लक्ष केंद्रित केले आहे. चांगले, सात्त्विक जीवन जगण्याच्या मार्गाची अनुभूती घेत गूढ आणि मानसिक शक्तींना अटकाव करते.

चौथा पाठ ‘कैवल्य पदा’चा आहे. त्याद्वारे मानसिक शक्ती प्राप्त करणाऱ्या माध्यमांवर लक्ष केंद्रित करता येते. आपल्या वैयक्तिक वेगळेणाचे ते कारण आहे, तुमचे वेगळेपण आणि वैश्‍विक मन, या सर्वांचे एकीकरण, आकलनशक्तीची थिअरी, मनाचा एखाद्या आयुधाप्रमाणे वापर हाच कैवल्याचा मार्ग आहे आणि शेवटी अर्थातच कैवल्य.

हे सर्व घटक तुमच्या आयुष्याला अधिक शक्तिशाली करण्यासाठी महत्त्वाचे आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?

चला, पुढील आठवड्यापासून योगाद्वारे मानसिक स्वच्छता, उपचार आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गक्रमण कसे करायचे ते पाहूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात थंडी पुन्हा वाढली; किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, तब्बल ११ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये केला प्रवेश

Vijay Wadettiwar: किडनी तस्करी प्रकरणी तक्रार मागे घेण्यासाठी राजकीय दबाव; विजय वडेट्टीवार, दोन दिवसांत नेत्याचे नाव जाहीर करण्याचा गौप्यस्फोट!

चंद्रपूर हादरलं! 'घरगुती कारणावरून पतीने पत्नीला जिवंत जाळले'; महाकाली वॉर्डातील घटना, मदतीसाठी ओरडत होती पण..

BJP AIMIM Row: ओवैसींसोबत युतीचा फटका! भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा महाराष्ट्रात ‘थेट इशारा’, पडद्यामागे काय घडलं?

SCROLL FOR NEXT