D-Vitamin
D-Vitamin D-Vitamin
health-fitness-wellness

काम करण्याची इच्छा होत नाही; तुमच्यात या जीवनसत्त्वाचा अभाव

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : ड जीवनसत्त्व किंवा कॉलिकॅल्सिफेरॉल हा शरीरातील काही महत्त्वाची कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक असणारा घटक आहे. जीवनसत्त्वांचे पाण्यात विद्राव्य आणि मेदात विद्राव्य असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो. विविध अन्नघटकांच्या माध्यमातून ड जीवनसत्त्व मिळू शकते. दररोज आहाराच्या माध्यमातून किमान दहा ते वीस मायक्रोग्रॅम तरी ‘ड’ जीवनसत्त्व असायला हवे.

सध्याच्या काळात ड जीवनसत्त्वाची कमतरता ही सर्वसामान्य लक्षण झाले आहे. एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे ही कमतरता सर्वत्र पसरत आहे. जवळपास निम्मे जग ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेने ग्रासलेले आहेत. अनेक व्यक्तींमध्ये ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे निदान होत आहे. यात किशोरवयीनांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे.

जगभरातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या ड जीवनसत्त्वाच्या अभावाचा सामना करीत आहे. अलीकडच्या माहितीनुसार ७६ टक्के भारतीयांमध्ये ड जीवनसत्त्वाचा अभाव आहे. या अभ्यासाने हेही स्पष्ट केले आहे की, १८ ते ३० वर्षे वयोगटातील भारतीयांमध्ये ड जीवनसत्त्व कमतरतेचे प्रमाण जास्त आहे. ज्याचे देशाच्या सर्वच भागांमध्ये सारखेच प्रमाण आहे.

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस हा विकार होतो. याच्या तीव्र विकारात गुडघ्यापासून खालील पायांची हाडे वाकडी होतात. मुडदूस विकारात हाडांचे अपुरे खनिजीकरण होते. प्रौढांमध्ये ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे अस्थिमृदुता होते. प्रौढ व्यक्तींच्या हाडांमध्ये कॅल्शिअम व फॉस्फरस यांच्या कमतरतेमुळे अस्थिसुषिरता निर्माण होते. या आजारात लहानशा धक्क्यामुळे देखील शरीरातील हाडे भंगतात. हाडांमध्ये मोठ्याप्रमाणात पोकळ्या तयार होतात.

कमतरतेमुळे होतात हे परिणाम

  • ‘ड’ जीवनसत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.

  • मासे, अंडी, फळे यांच्या सेवनाने त्वचेची चमक टिकून राहते.

  • वारंवार आजारी पडणे, थकवा येणे असे त्रास होत असतील तर ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते.

  • जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्वभाव चिडचिडा होतो.

  • कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही.

यातून मिळतात ‘ड’ जीवनसत्त्व

  • मशरूम्समधून ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकतात

  • ओट्सच्या माध्यमातूनही 'ड' जीवनसत्त्व मिळतात

  • फळांच्या रसामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व मिळते

  • संत्र्याच्या रसातून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते

  • ट्यूना नामक माशातही ‘ड’ जीवनसत्त्व असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT