Weight Loss Walk 
health-fitness-wellness

रोज १० हजार पावलं चाला! वजन कमी करा

वजन नियंत्रणात राहण्यासाठी अनेकजण चालणं पसंत करतात

सकाळ डिजिटल टीम

वजन नियंत्रणात राहण्यासाठी अनेकजण चालणं पसंत करतात. तसेच व्यायाम केल्यानेही फायदे होतात. पण सगळ्याच लोकांना व्यायाम (Exercise) जमतोच असं नाही. रोजच्या धावपळीच्या जगात व्यायाम करायला न जमल्याने लोकांचे वजन वाढते आहे. त्यामुळे अनेक लोकं वैतागले आहेत. पण जर तुम्ही १० हजार पावलं चाललात तर तुमचं वजन कमी (Weight Loss) होऊ शकतं. शास्त्रज्ञांच्या मते, दररोज १० हजार पावले चालण्याने (Walk) तुमचा रक्तदाब सामान्य तर राहतोच शिवाय तुमचे वजनही कमी होते. नियमित थकवा येत असेल तर तो कमी होतो. तसेच महिन्याभरात नियमितपणे अशाप्रकारे चालल्याने तुमच्या शरीरात सकारात्मक बदल जाणवू शकतात.

walking

शरीराला होतात ५ फायदे

- बीपी कंट्रोलमध्ये राहते. चालल्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते.

- रोज १० हजार पावले चालल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

- चालल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात.

- १० हजार पावलं चालल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.

- अशाप्रकारे चालल्याने तुम्हाला कायम सकारात्मक वाटते. तशी उर्जा तुम्हाला मिळते.

walk

अशाप्रकारे करा टार्गेट पूर्ण

तुम्ही एकाचवेळी असे चालण्यापेक्षा दिवसभरात हे टार्गेट पूर्ण करा. सकाळी लवकर उठून चालायला जमले नाही तरी हरकत नाही. पण तुम्हाला घरातील सामान आणायला जायचे असेल, ऑफिससाठी ट्रेन पकडायची असेल तर यासाठी बाईक किंवा कार वापरण्यापेक्षा चालत जाऊन हे काम पूर्ण करा. पायऱ्या चढायलाही हरकत नाही. जिथे शक्य असेल तिथे दिवसभरात चालत जाण्याचा प्रयत्न करा. एकट्याने चालायचा कंटाळा आला असेल तर गाणी ऐकत किंवा आवडते पॉडकास्ट (Podcast) कार्यक्रम ऐकत तुम्ही चालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT