weight loss
weight loss 
health-fitness-wellness

आहारात करा या पदार्थांचा समावेश; मिळतील भरपूर फायदे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा बऱ्याचदा काही पदार्थांना जास्त महत्त्व देण्यात येते. प्रत्यक्षात प्रचंड फायदेशीर असलेले पदार्थ सहज विसरून जातो. वजन कमी करण्याच्या प्रवासात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, हे विसरून चालणार नाही. आपण काय खातो? किती खातो? यावरही वजन अवलंबून असते.

एकाच ठिकाणी बसून काम करणे, शारीरिक हालचाली नसणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे काही जण वजन वाढीच्या समस्येचा सामना करतात. वजन वाढल्याने अन्य गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते. भविष्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. तेव्हा वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करणाऱ्या अन्नपदार्थांविषयी आपल्याला माहिती असते फार गरजेचे आहे.

बीएमआर कमी करा

नियमितपणे BMR म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याची गती तपासण्याची गरज असते. शरीराचा BMR माहित असेल तर जेवणातील कॅलरीज कमी करू शकता. असे केल्याने वजन आपोआप नियंत्रित राहील.

व्यायाम फार महत्त्वाचा

काही दिवस व्यायाम केला नाही तर लगेच वजन वाढू लागते. योगाभ्यास केल्याने अन्नाचे शरीरात पूर्णपणे संमिलन होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते व जड असलेले अन्न सेवन करण्याची रुची कमी होते.

समतोल पुनर्स्थापित करा

वजन वाढणे किंवा कमी होणे हा हार्मोन्स (संप्रेरक) असंतुलित झाल्याचा परिणामही असू शकतो. ध्यानसाधना केल्याने शरीरातील सर्व प्रणालींचा ताळमेळ जमून येतो. परिणामी तुम्ही स्थूल असाल तर वजन कमी करता येते किंवा तुमचे वजन कमी असेल तर ते वाढवता येते.

आहसफरचंद

सफरचंदांमध्ये कॅलरीज कमी असतात. पण, महत्त्वपूर्ण पोषक तत्व खूप असतात. सफरचंदांमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ते तुमचे पचनक्रिया व पोटाचे आरोग्य चांगले राखते. फायबर जास्त असल्याने सफरचंद जास्त काळ तृप्त ठेवते.

बदाम

बदामामध्ये कॅलरीज जास्त असतात पण त्यात हेल्दी फॅट असतात. बदाम हे प्रोटीन आणि फायबरसह अनेक पोषक घटकांचे समृद्ध स्त्रोत आहेत, जे अधिक काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते.

रताळ

रताळ वजन कमी करण्यासाठी सर्वांत कमी दर्जाच्या पदार्थापैकी एक आहे. रताळमध्ये भरपूर फायबर, कमी कॅलरी आणि अत्यंत हायड्रेटिंग असे तत्व असतात. रताळ भूक कमी करण्यास मदत करण्याबरोबरच जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ प्रदान करतात.

आहारात करा याचा समावेश

  • हिरव्या भाज्या

  • हेल्ही आहार

  • गोड खाणे टाळा

  • डार्क चॉकलेट

  • मेथीची दाणे

याचा करा अवलंब

  • सकाळी लवकर उठा

  • नाष्टा करायला विसरू नका

  • भरपूर पाणी प्या

  • पुरेसे प्रथिने आणि कार्बोहायड्रेस घ्या

  • व्यायाम करा

  • शरीराचे ऐका

  • पुरेशी झोप घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT