health-fitness-wellness

वजन कमी करायचं आहे का? डायटमध्ये करा 'या' 4 फूड्सचा वापर

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन, संचारबंदीमुळे लोकांचे घरी राहण्याचे प्रमाण वाढले. बाहेर फिरण्यास मनाई असल्याने अनेकांच्या दिवसभराच्या रुटीनवर याचा परिणाम झाला. वर्कआऊटसह अनेक अॅक्टीविटींना ब्रेक लागला. अनेकांचे लॉकडाऊनच्या काळात अनेक स्वादिष्ट पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढवले. परिणामी व्यायाम नसल्याने आणि ऑईली पदार्थांच्या सेवनाने वजन वाढण्याच्या समस्या सुरु झाल्या. अनेकांचे वजन यादरम्याव वाढले आहे. तुम्हाला माहित आहे की, वजन कमी होणे कठिण आहे. परंतु योग्य आहाराचे टाईमटेबल तयार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला रुटीन डायट फॉलो करावा लागेल. आम्ही अशा काही महत्वाच्या डायट फुड संदर्भात आम्ही सांगणार आहोत, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

केल -

केल ही पालेभाजी दिसायला जितकी सुंदर आहे तितकाच तिचा स्वादही उत्तम आहे. यामध्ये अनेक पोषकतत्वे आहेत. यामध्ये विटामीन के चे प्रमाण अधिक असते. एक कप ६७ ग्रॅम केलमध्ये के च्या सातपट मात्रा असते. ज्याची दिवसभर आपल्याला आवश्यकता असते. तुम्ही सलाद किंवा स्मुदी तयार करुन याचे सेवन करु शकता.

ब्रोकली -

अनेक विटामीन आणि खनिजांचे एक स्त्रोत म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळे हेल्दी फुडच्या लिस्टमध्ये हे नेहमी टॉपला असायला हवे. हा झिरो कॅलरीचा एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये असणारे फायबर शरीरासाठी एका संत्रीत प्रमाणे काम करतात. यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

कलिंगड -

गरमीच्या दिवसात कलिंगड खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरते. याला एक झिरो कॅलरीवाला घटक म्हणून ओळखले जाते. यामध्ये ऍंटीऑक्सिडंट आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामध्ये असणारे हैसिट्रुलाइन हे एमिनो अॅसिडचे काम करते. जे वजन कमी करण्यास मदत करते. यामुळ बराच काळ तुम्ही डीहायड्रेट राहू शकता.

मशरुम -

अनेक वर्षांपासून याला औषधीय आहारमध्ये गणले जाते. पास्ता, बर्गर किंवा अन्य काही पदार्थांना सजवण्यासाठी याचा वापर होतो. याचा वजन कमी करण्यासाठीही उपयोग होतो. झिरो कॅलरीचा आहार म्हणून याकडे पाहिले जाते. तसेच पचनासाठीही हे उपयोगी आहे. अॅंटीऑक्सिडंटचे प्रमाण असणारे मशरुम हे कॅंसरग्रस्तला लढण्यासाठी उपयोगी ठरते. शिवाय कोलेस्ट्रोल आणि मधुमेह कमी करण्यासाठी हे उपयोगी पडते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT