Protein Food For Weight Loss
Protein Food For Weight Loss esakal
health-fitness-wellness

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी high protein पदार्थ नक्की खा

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Tips: वजन कमी करतानाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे शरीरात अशक्तपणा (Weakness) न येऊ देता अतिरिक्त चरबी कमी करणे. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केले तर वजन कमी होतं, पण त्यामुळे अशक्तपणाही येतो. डायटिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा खायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला जास्त भूक लागते, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. यासाठी डाएटिंग (Dieting) करण्याऐवजी फायबर, लोह आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा (Protein based foods) आहारात समावेश करावा. विशेषत: रात्रीचे जेवण वगळण्यापेक्षा, रात्रीच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणे चांगले. चला, जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी प्रभावी प्रोटीन पदार्थ-

1. अंडी (Eggs)-

तुमच्या वजन कमी करण्याच्या आहार योजनेत अंडी खूप महत्त्वाची आहेत. ती खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. अंड्यातील प्रथिनासोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी(Vitamin D), , व्हिटॅमिन बी-12 (Vitamin B-12) आणि इतर अनेक पोषक घटक असतात. रात्रीच्या जेवणात उकडलेले अंडे जरूर खावे.

2. दूध (Milk)-

उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांच्या यादीत दूध शीर्षस्थानी येते. त्यात अनेक पोषक घटक असतात, म्हणून दुधाला पुर्णान्न म्हणतात. दूध प्यायल्यानंतर झोपणे हा देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे अन्नाचे पचन तर होतेच पण वजनही नियंत्रणात राहते. प्रथिनांसह(Protein), दुधामध्ये कॅल्शियम (Calcium), व्हिटॅमिन डी (Vitamin D), पोटॅशियम (Potassium) इत्यादी पोषक घटक असतात.

3. सोयाबीन (Soybean)-

शाकाहारी लोकांना प्रथिनांची सर्वाधिक गरज असते, त्यामुळे तुम्ही आहारात सोयाबीनचा समावेश केलाच पाहिजे. सोयाबीन करी किंवा सॅलाड हे देखील आरोग्यदायी पर्याय आहेत. प्रथिनांना पूरक म्हणून सोयाबीनपासून बनवलेल्या दुधाचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. त्यात व्हिटॅमिन ए, सी, के (Vitamins A, C, K), आणि लोह (Iron), मॅग्नेशियम (Magnesium) यांसारखे पोषक घटक देखील असतात.

4. भुईमूग (Groundnut)-

जर तुम्हाला सुका मेवा सहज पचत नसेल तर तुम्ही शेंगदाणे जरूर खावे. शेंगदाण्यात जास्त प्रथिने असतात. विशेषतः हिवाळ्यात शेंगदाण्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणात तुम्ही ब्राऊन ब्रेडसोबत पीनट बटरही (peanut butter) खाऊ शकता. शेंगदाण्यात प्रोटीन व्यतिरिक्त फायबर, आयरन, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी असतात.

5. डाळ (Dal)-

जेव्हा प्रथिनांचा प्रश्न येतो आणि त्यात डाळींचा उल्लेख होत नाही, असे होऊ शकत नाही. सर्व कडधान्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. रात्रीच्या जेवणात मूग डाळ, अरहर डाळ जरूर खावी. यामुळे तुमची पचनक्रियाही चांगली राहते. प्रथिनाव्यतिरिक्त, डाळींमध्ये व्हिटॅमिन बी 6, फायबर, थायामिन, नियासिन इत्यादी पौष्टिक घटक असतात.

6. पनीर (Paneer)-

पनीर बहुतेक शाकाहारी (Vegetarian people)लोकांना खूप आवडते. जर तुम्ही अंडी खात नसाल तर आहारात कॉटेज चीजचा नक्कीच समावेश करा. दुधासह बनवलेले पनीर हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. रोस्ट पनीर, पनीर पराठे, पनीर सॅलड या काही आरोग्यदायी पाककृती आहेत. पनीरमध्ये प्रथिनासोबतच पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, आयर्न देखील असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT