health care anemia
health care anemia  
health-fitness-wellness

अॅनेमिया म्हणजे काय? कशी आहेत याची लक्षणं आणि कारणं

सकाळ वृत्तसेवा

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता झाल्याने टिशू आणि मांसपेशी यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. त्यामुळे शरीर शक्तीहीन होत जाते, याला अॅनेमिया म्हणतात. प्रत्येकवेळी थकवा जाणवणे, उठता-बसता चक्कर येणे, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, ह्रद्याची असामान्य धकधक, श्वास घेण्यास त्रास होणे, तळवे आणि हात थंड पडणे इत्यादि अॅनेमियाची लक्षणे आहेत.

शरीरातील लोह म्हणजे काय? 
लोह हे एक शरीरातील खनिज आहे. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह अत्यावश्यक असते. हे शरीरातील लाल रक्तपेशींना शरीराच्या सर्व भागात ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करतं.

अॅनेमिया होण्यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय कराल? 

शरीरात रक्ताची कमतरता होणे यालाच अॅनेमिया म्हणतात. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात काही बदल केल्यास फायदा होऊ शकतो.

-शरीरातील लोहाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहारात गाजर, टोमॅटो आणि पालेभाज्या यांचा समावेश करणे फायद्याचे ठरते.

- घरी स्वयंपाक करताना नेहमी लोखंडाच्या भांड्यांचा वापर करावा. असे केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण चांगले वाढते.

- शरीरातील कॅल्शियमचे अधिकचे प्रमाण लोहाच्या उपभोगासाठी अडथळा ठरु शकते. कॅल्शियमला सामान्य प्रमाणात शरीरात घ्या किंवा डॉक्टरांचा याबाबत सल्ला घ्या.

- आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण आपल्या वजनाच्या प्रमाणात असावे लागते. शरीरात 3 ते 5 ग्रॅम लोह असते. याचे प्रमाण जेव्हा कमी होते. तेव्हा शरीरात रक्त बनने आपोआप कमी होत जाते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT