health-fitness-wellness

काय आहे लाँग टर्म कोविड? कोरोनाच्या नव्या रुपाची लक्षणं माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर देशात पुन्हा एकदा वाढताना दिसतो आहे. देशात पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संदर्भात अलिकडेच समोर आलेला एक रिपोर्ट सध्या आपल्या चिंतेत आणखी भर घालू शकतो. मात्र, आपल्याला या विषयी पुरेशी आणि नीट माहिती असणं आवश्यक आहे. कोरोना संदर्भात प्रकाशित झालेल्या एका नव्या अहवालानुसार, कोविडच्या संक्रमणातून बरे झाल्यावर देखील कोरोनाची लक्षणे तब्बल तीन महिन्यांपर्यंत रुग्णाच्या शरीरात राहतात. NICE अर्थात National Institute for Health and Care च्या एका रिपोर्टनुसार, कोरोनाच्या या नव्या रुपाचा आता शोध लागला आहे. या रुपाला लाँग टर्म कोविड या नावाने ओळखलं जातं.

काय आहे हा लाँग टर्म कोविड

लाँग टर्म कोविड एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये बाधित रुग्ण कोरोनाच्या संक्रमणापासून बरा झाल्यावर देखील आणि त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावर देखील त्याच्यामध्ये अनेक आठवड्यांपर्यंत अथवा महिन्यांपर्यंत लक्षणे राहू शकतात.

कोविड संक्रमितांमध्ये दिसतात 100 हून अधिक लक्षणे

एका रिपोर्टनुसार कोरोना संक्रमितांमध्ये दीर्घकालिक कोविड लक्षणे आठवडे आणि महिन्यामध्ये वेगवेगळी दिसू शकतात. एका रिपोर्टनुसार 5163 अशा लोकांशी चर्चा केली गेली जे मोठ्या काळापासून आजारी होते. यामधील 75 टक्क्यांहून अधिक लोक कोरोना पॉझिटीव्ह होते अथवा लक्षणांच्या आधारावर डॉक्टरांनी त्यांना डायग्नोस केलं होतं. या संशोधनानुसार, रुग्णांना लाँग कोविडच्या प्रकोपादरम्यान 100 हून अधिक लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, ही सर्व लक्षणे कोरोनाशी निगडीतच असतील असे नाही. एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, या दोन्हींच्या खात्रीसाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

काय आहेत याची लक्षणे

  • थकवा

  • श्वास घेण्यास त्रास

  • चिंता आणि नैराश्य

  • धडधड

  • छातीत दुखणे

  • सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना

  • लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता (‘brain fog’)

  • 12 आठवड्यांहून अधिक काळ दिसू शकतात लक्षणे

नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ एँड केअरच्या एका रिपोर्टनुसार, कोविडच्या रुग्णांमध्ये निगेटीव्ह रिपोर्ट येऊनही 12 आठवड्यांहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे दिसून येतात. तर दुसऱ्या बाजूला ऑफिस फॉर नॅशनल स्टेस्टीस्ट (ONS) च्या एका रिसर्चनुसार, प्रत्येकी 10 पैकी एका रुग्णामध्ये 12 आठवड्यांपर्यंत अथवा त्याहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे दिसून येतात.

याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी लाँग कोविडची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची दोन गटात विभागणी केली आणि त्यांनी याबाबतचा अभ्यास केला. त्यानुसार, एका गटातील लोकांना फक्त श्वासोच्छवासासंबंधी लक्षणे होती. जसे की, खोकला, श्वासोच्छवासास त्रास होणे, त्याचप्रमाणे थकवा, धाप लागणे आणि डोकेदुखी. तर दुसऱ्या गटामधील लोकांमध्ये शरीराच्या इतर अंगांच्या त्रासाबद्दल तक्रारी होत्या जसे की, हृदय, मेंदू यांच्यासंदर्भातील लक्षणे. या अभ्यासामध्ये 4,182 रुग्णांना हृदयासंबंधी लक्षणे आढळली होती, जसे की छातीत धडधड आणि लक्ष केंद्रीत करण्यास असमर्थ वाटणे इ.

लाँग कोविड किती काळ राहू शकतो?

याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाहीये. कारण याबाबतचा सविस्तर अभ्यास सध्या सुरु आहे. लाँग कोविड किती काळ कोणत्या रुग्णांमध्ये राहू शकतो तसेच कसा परिणाम करु शकतो याबाबत सध्या उभ्यास सुरु आहे.

आठवड्यांमध्ये अशाप्रकारे बदलतात लक्षणे

इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये असोसिएट रिसर्च प्रोफेसर नताली लँबर्ट यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या सुरवातीच्या फ्लू दरम्यान संक्रमितांमध्ये थकवा, डोकेदुखी, ताप आणि थंडी वाजणे, उलटीसारखी सामान्य लक्षणे दिसू शकतात. मात्र आठवड्यानंतर याचं रुप भयानक होतं. त्यानंतर कन्फ्यूजन, ब्रेन फॉग, सांधेदुखी आणि ऑक्सिजनची कमतरता यासांरखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. 15 दिवसांनंतर हाय-लो ब्लड प्रेशर, हर्ट रेट वाढणे, शुद्ध हरपणे, चक्कर येणे यासारंखी लक्षणे दिसू शकतात. सोबतच 21 दिवसांनंतर संक्रमितांमध्ये असामान्य लक्षणे जसे की डोळे लाल होणे, डोळ्यात संक्रमण, त्वचेसंबंधी रोग इत्यादी दिसून येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT