Know Blood Sugar Level By Age
Know Blood Sugar Level By Age 
health-fitness-wellness

Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण ठेवले पाहिजे. जर, तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar Level) नसेल तर तुमच्या शरीरात (Body) अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. तुमच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन कसे करावे ते शिकणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निरोगी (Healthy) राहू शकाल. (Know Blood Sugar Level By Age)

हृदयरोग, दृष्टी कमी होणे आणि किडनी रोग यासारख्या गंभीर दीर्घकालीन आरोग्य समस्या टाळण्यासाठी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी किती आहे त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नेमकी रक्तातील साखरेची पातळी किती हवी?असा अनेकांना प्रश्न पडतो. कारण तुमच्या साखरेच्या पातळीवरच तुमची उर्जा आणि मूड सुधारण्यासाठी मदत अवलंबून असते. मधुमेहींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी हे माहित असले पाहिजे. एवढेच नाही तर ज्यांना मधुमेह नाही त्यांनाही आपल्या रक्तातील साखरेची पातळी किती आहे, ते माहिती असणे गरजेचे आहे.

Blood Sugar Level

रक्तातील साखरेची पातळी किती असावी? (What Should Be Your Blood Sugar Level?)

अमेरिकन डायबिटिज असोसिशनने टाईप १ च्या मधुमेह रूग्णांसाठी शिफारस केली आहे की, रक्तातील साखरेचे प्रमाण एखाद्या व्यक्तीच्या गरजा आणि लक्ष्यांवर आधारित असावे. या उद्दिष्टांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधणे गरजेचे आहे.

जेवणाआधी किती असावी (Blood Sugar Before Take Food)

ज्येष्ठांसाठी ९० ते १३० mg/dL (5.0 ते 7.2 mmol/L) पर्यंत.

१३ ते १९ वर्षांच्या मुलांसाठी ९० ते १३० mg/dL (5.0 ते 7.2 mmol/L) पर्यंत.

६ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी ९० ते १८० मिलीग्राम/डीएल (5.0 ते 10.0 मिमीोल/लीटर) पर्यंत.

६ वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांसाछी १०० ते १८० मिलीग्राम/डीएल (5.5 से 10.0 मिमीोल/ली) पर्यंत.

जेवणानंतर १ ते २ तासांनी किती असावी?

ज्येष्ठांसाठी १८० mg/dL (10 mmol/L) पेक्षा कमी

झोपताना साखरेची पातळी किती असावी?

जेष्ठांसाठी ९० ते १५०mg/dL (5.0 ते 8.3 mmol/L) पर्यंत.

१३ ते १९ वर्षांच्या मुलांसाठी ९० ते १५० mg/dL (५.० ते ८.३ mmol/L) पर्यंत.

६ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी १०० ते १८० मिलीग्राम/डीएल (५.५ ते १०.० मिमीोल/लीटर) पर्यंत.

६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी ११० ते २०० mg/dL (6.1 से ११.१ mmol/L) पर्यंत.

सामान्यपणे जेवणानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अशी असावी?

जेष्ठांसाठी ७० ते १३० mg/dL (३.९ ते ७.२ mmol/L) पर्यंत

जेवणानंतर १ ते तासांनी १८० mg/dL (१०.० mmol/L) पर्यंत कमी

Diabetes

मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे? (How To Control Your Diabetes?)

लो ब्लड शुगर हाइपोग्लाइसीमिया) चे लक्षण ओळखा आणि उपाय करा

हाय ब्लड शुगर (हाइपरग्लेसेमिया) ची लक्षणं ओळखून त्यावर योग्य उपाय करा.

आरोग्यपूर्ण जेवण खाण्याचा विचार करा

ग्लुकोजवर नियंत्रण ठेवा

आजारी पडलात तर स्वत:ची काळजी घ्या

गरजेप्रमाणे डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या

जर तुम्ही इंशुलिन घेत असाल तर स्वत:ला ते कसे द्यायये याविषयी नीट माहिती करून घ्या.

व्यायामाच्या दरम्यान आणि आाजारी असताना तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मॅनेज करणे गरजेचे आहे. यादरम्यान खाण्यावरही लक्ष असू द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT