Breathing Problem  esakal
health-fitness-wellness

थोडंसं चालून दम लागतोय! असू शकतात ५ कारण

ही कारणे दिसल्यास लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

खूप वेळ व्यायाम करून किंवा धावल्यांतर दम किंवा श्वास लागणे ही सामान्य बाब आहे. पण घाम न येता दम लागत असल्यास शरीरात (Body) काहीतरी गडबड असल्याचे संकेत देतात. अशक्तपणा, अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यासारख्या अनेक कारणांमुळे श्वासोच्छवासाचा त्रास( Breathing Problem)होऊ शकतो. ऍलर्जीच्या वातावरणात राहूनही, तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामागचे नेमके कारण शोधून काढणे गरजेचे आहे. कारण त्यानुसार तुम्हाला वैद्यकीय मदत (Medical Help) मिळू शकते.

१)फुफ्फुसाच्या समस्या- फुफ्फुसाची स्थिती ही श्वासोच्छवासाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, पल्मोनरी एडेमा आणि क्षयरोग यासारख्या फुफ्फुसांच्या समस्या निर्माण झाल्यावर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तर काही वेळा श्वासनलिकेत कफ साठतो. तर काही वेळा श्वासनलिका अरुंद होऊ शकते. यामुळे फुफ्फुसातून हवा जाणे कठीण होते. अशावेळी लक्षणे ओळखून डॉक्टरांकडून लगेच उपचार घ्यावेत.

heart

२) हृदयाची स्थिती- हृदयाच्या अनेक आजारांमुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, जेव्हा तुम्ही सक्रिय असता किंवा आराम करत असता तेव्हा तुम्हाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने श्वास अडकू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

३) चिंता- गेल्या काही वर्षात मानसिक आरोग्याबाबत खूप चर्चा घडत आहेत. महामारीच्या काळात अनेकांना चिंतेने ग्रासले होते. त्यामुळे त्याविषयी जागरूकता ही गरज बनली होती. काहीवेळा श्वास लागणे, छाती भरून येणे किंव सहज थकवा येणे अशी काही लक्षणे चिंतेदरम्यान असू शकतात. ब्रिटीश लंग फाऊंडेशनच्या मते, चिंता आपल्या शरीर, विचार आणि भावनांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. अशावेळी हळू-जोरात श्वासोच्छवास घेणे अशी लक्षणे दिसतात.

Weight Loss Tips

४) वजन जास्त असणे- वजन जास्त असल्याने अनेकदा दम लागू शकतो. हे एक सामान्य कारण आहे. जरी तुमचे वजन खूप कमी किंवा जास्त असले तर फुफ्फुसाच्या समस्या निर्माण होता. अशावेळी श्वास घेण्या- सोडण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात.

५) एलर्जी - अनेक प्रकारच्या ऍलर्जींमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तुम्ही ज्या वातावरणात आहात त्या पदार्थाच्या ऍलर्जीचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच त्याशिवाय तुम्हाला खोकला, घरघर आणि छातीत घट्टपणा जाणवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT