Winter Health Care esakal
health-fitness-wellness

Winter Health Care : हिवाळ्यात जास्त पाणी पिता? सावधान, ओढावू शकतो मृत्यू

ओव्हर हायड्रेशनने माणूस हायपोनायट्रेमियाच्या स्थितीत जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट वेगात कमी होतात आणि मृत्यू ओढावू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Over Water Drinking Causes Death : आपण नेहमी ऐकलं असेल की, खूप पाणी प्या, स्कीनसाठी, आरोग्यासाठी चांगलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, जास्त पाणी पिल्यानेही मृत्यू ओढावू शकतो. थंडीत लोक तसेही पाणी कमी पितात. पण काही लोक फिटनेसच्या नादात गरजे पेक्षा जास्त पाणी पितात. पण तुम्हाला माहितीये का मार्शल आर्टस किंग ब्रुस लीचा मृत्यू पण जास्त पाणी प्यायल्याने झाला होता.

काही तज्ज्ञांच्या मत जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पितात तेव्हा तुमच्या किडनीवर त्याचा अतिरीक्त ताण येतो. ब्रुस ली यांनी जास्त पाणी प्यायल्याने त्यांची किडनी फेल झाली अन् मृत्यू झाला असं नव्या शोधात समोर आलं.

सायन्स सांगतं की, गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने ओव्हरहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे तापमान, उत्सर्जन आणि पचनक्रिया यावर विपरित परिणाम होतो. ओव्हरहायड्रेशनमुळे माणूस हायपोनायट्रेमियाच्या स्थितीत जातो. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट वेगात कमी होतात आणि मृत्यू ओढावू शकतो.

एका दिवसात किती पाणी प्यावं?

आपण बऱ्याचदा ऐकतो की, दिवसाला ८ ग्लास पाणी प्यावं. पण खरच एवढ्या पाण्याची आवश्यकता असते का? एका रिसर्चमध्ये हे सिध्द झालं आहे की, पुरुषांनी दिवसभरात साधारण ३.७ लीटर पाणी प्यावं. तर स्त्रियांनी २.७ लीटर पाणी प्यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

SCROLL FOR NEXT