health and beauty tips 
health-fitness-wellness

थंडी गुलाबी असली तरी त्वचेची काळजी घ्यावीच लागते ना? जाणून घ्या खास टिप्स

सकाळ ऑनलाईन

हिवाळ्यातील थंडी कधी गुलाबी तर कधी कुडकुडी भरवणारी अशी असते. कुणाला पावसाळ्यातील दलदलीपेक्षा हा ऋतू हवासा वाटतो. तर कुणाला उन्हात घामाच्या धारा सहन करण्यापेक्षा दोन कपडे अधिक घालून थंडीत फिरलेलं बर अशी अवस्था असते. ज्या-त्या भागातील हवामानानुसार थंडीचे रुप बदलतानाचे चित्र पाहायला मिळते.

त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते  हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक  छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात.  हात आणि पायांवर रॅशेस पडणे (फुटणे) ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे होत असते. चला तर मग जाणून घेऊयात थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या नेमकेपणाने करुन त्वचा टवटवीत कशी ठेवता येईल यासंदर्भातील काही खास टिप्स 

1) एका बादलीत किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे व त्या पाण्यात एक ते  दोन चमचे शाम्पू किंवा फेस वॉश टाकावा.
2) खोबऱ्याचे तेल त्वचेला लावणे खूप उपयुक्त आहे. तेलाचे आठ ते नऊ  थेंब पाण्यात टाकावे. 
3)लिंबाच्या कापलेल्या एक ते दोन फोडी पाण्यात टाकाव्या.
4)तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकावा.
5) या पाण्यात हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.
6) लिंबाचा सालीने हात व पाय घासावे तुरतीने ही  हात पाय घासावे.
7) दहा ते पंधरा मिनिटानंतर हात पाय स्वच्छ कापडाने अथवा रुमालाने पुसून टाकावे
8) हात व पायांना आवडीनुसार बॉडी लोशनचा वापर करावा. 
9) बाजारात काही आयुर्वेदिक लोशनही उपलब्ध आहेत. ते वापरण्यासही हरकत नाही
10)साबणाच्या वापरामुळेही त्वचा फुटण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे साबण निवडतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. 

------------------------------------------------------------------------------------------------

(थंडीच्या दिवसांत त्वचेची निगा राखण्यासाठी उपायासंदर्भात कोणताही उपाय करताना कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला निश्चित घ्यावा. माहितीच्या आधारावर कोणत्याही गोष्टी करु नयेत.)   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT