chocolate e sakal
health-fitness-wellness

चॉकलेटला चार हजार वर्षांचा इतिहास, ही आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काही अपवाद सोडले तर चॉकलेट हा लहान-थोरांपासून सर्वांचाच आवडीचा पदार्थ. आपण आनंदाचे अनेक क्षण साजरे करतो. त्या क्षणांचा आनंद आपण चॉकलेट खाऊन नक्कीच द्विगुणित केला असणार. एखाद्या सेलिब्रेशनमध्ये केक किंवा पेस्ट्रीसारखे चॉकलेट्स नसतील तर ते सेलिब्रेशनच अपुरेच वाटते. याच चॉकलेटच्या आठवणीत दरवर्षी ७ जुलैला जगभरात ‘चॉकलेट-डे’ साजरा केला जातो. (World Chocolate Day 2021 chocolates have 4000 years old history)

पहिल्यांदा युरोपात साजरा -

७ जुलै १५५० रोजी युरोपात पहिल्यांदा चॉकलेट डे साजरा करण्यात आला. सुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. त्यांनतर १८२८ मध्ये डच केमिस्ट कॉनराड जोहान्स वान हॉवन या व्यक्तीने कोको प्रेस नावाचं यंत्र बनवलं. १८४८ मध्ये जे. एस. फ्राई अॅड सन्स या ब्रिटिश चॉकलेट कंपनीने कोकमध्ये बटर, दूध आणि साखर मिसळून त्याला घट्ट चॉकलेटचे स्वरूप दिले.

चार हजार वर्षांचा इतिहास -

विश्वास बसणार नाही, मात्र चॉकलेटला तब्बल चार हजार वर्षांचा इतिहास आहे. चॉकलेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘कोकोआ’ वनस्पती सर्वप्रथम मॅक्सिकोत आढळली. त्यानंतर अमेरिकेने या वनस्पतीपासून चॉकलेट तयार करण्याची पद्धत विकसित केली. त्यावेळी देवाचा प्रसाद म्हणून चॉकलेटचा उपयोग व्हायचा. तर काही ठिकाणी औषध म्हणून चॉकलेटचे सेवन केले जायचे.

ही आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स -

  • नोका चॉकलेट - या चॉकलेटची किंमत ३३० डॉलर म्हणजे तब्बल २४६०२.२१ रुपये आहे.

  • व्होसजेस हौट चॉकलेट - खास स्टेट्स आणि फ्लेवरसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या चॉकलेटची किंमत ६२०० रुपये आहे.

  • गोडिवा चॉकलेट - या १५ चॉकलेट्सची किंमत ८९४६ रुपये आहे.

  • डेबॉव आणि गॅलाइस चॉकलेट - या चॉकलेटची किंमत ६२०४१ रुपये आहे.

  • गोल्ड चॉकलेट - बाजारात हे चॉकलेट ३५०१८ रुपयांत मिळते

चॉकलेट्सचे फायदे -

  • रक्तदाब कमी करते

  • हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो

  • प्रग्नेंसीमध्ये चॉकलेट खाल्यास तणाव दूर होतो

  • डोके शांत ठेवते

  • ब्लड प्रेशरसाठी उपयोगी

  • तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर

  • वजन घटवण्यात गुणकारी

  • मानसिक स्वास्थ चांगले राहते

  • व्यक्तीचा मूड फ्रेश राहतो

  • त्वचा निरोगी राहते

कोणते चॉकलेट सर्वात फायदेशीर?

चॉकलेटचे तीन प्रकार आहेत. यातील व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यात कोकोआ मुख्य घटक आहे. त्यात साखर अजिबात नसते आणि कोकाचे प्रमाण अधिक असते.

एका दिवसात किती चॉकलेट खावीत?

एका दिवसात ३० ते ६० ग्रॅमपेक्षा जास्त चॉकलेट खाऊ नये. जास्त प्रमाणात चॉकलेट सेवन केल्याने दररोजची कॅलरी संख्या वाढेल, ज्यामुळे वजन वाढणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

डार्क चॉकलेट सेवनाचे तोटे -

डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डार्क चॉकलेटचे अतिसेवन घातक आहे. यामुळे अनिद्रा, डोकेदुखी किंवा मायग्रेन, चक्कर येणे, डिहायड्रेशन होऊ शकते, चिंता, वजनवाढ, हृदयाचे ठोके वाढू शकतात, चेहऱ्यावर पिंपल्स, छातीत जळजळ. यामुळे नियंत्रित चॉकलेट सेवन कधीही फायद्याचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT