about-hepatitis.jpg 
health-fitness-wellness

World Hepatitis Day : हिपॅटायटीस 'हा' प्रकार एचआयव्हीप्रमाणेच पसरतो...अन् कर्करोगालाही देतो निमंत्रण..

गायत्री जेऊघाले : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अशुद्ध पाणी, रक्‍तातील संक्रमणासह अन्‍य विविध कारणांमुळे कावीळ (हिपॅटायटीस) होण्याचा धोका निर्माण होत असतो. आपल्‍याकडील भागात हिपॅटायटीस 'ए', 'बी' आणि 'ई' या प्रकारांतील रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येतात. मंगळवारी (ता. २८) जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा करताना जागतिक आरोग्‍य संघटनेने 'हिपॅटायटीसमुक्‍त भविष्य' हे घोषवाक्‍य निश्‍चित केले आहे. 'या' कारणांमुळे हिपॅटायटीस धोका सर्वाधिक...तर 'या' प्रकारांतील रुग्ण अधिक...वाचा सविस्तर

'हिपॅटायटीस ए' आणि 'हिपॅटायटीस ई' बाबतचा धोका कमी

ग्रामीण भागात जिल्‍हा परिषद यंत्रणेमार्फत जन्‍माला आलेल्‍या ९५ टक्‍के बाळांना चोवीस तासांच्‍या आत लस दिली जात असल्‍याने हिपॅटायटीसमुक्‍त भविष्याचे ध्येय्य साधले जाते आहे. जिल्हा परिषदेकडून प्रत्येक नवजात बालकांना 'हिपॅटायटीस बी' म्हणजेच काविळीची लस जन्‍मतः चोवीस तासांच्या आत दिली जाते. जवळपास ९५ टक्के बालकांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे बाळाच्या आईला लागण असली तरीही बाळाला आजार होण्याची भीती राहत नाही. बाळाला लस दिलेली असल्‍याने याबाबत सर्वेक्षण केलेले नाही. तसेच पाण्याच्या शुद्धीकरणावरही जिल्हा परिषदेने विशेष लक्ष दिल्याने 'हिपॅटायटीस ए' आणि 'हिपॅटायटीस ई' बाबतचा धोका कमी झाला आहे. 

'हिपॅटायटीस बी' हा एचआयव्हीसारखा पसरतो 

दर वर्षी जिल्हा परिषदेकडून हिपॅटायटीसबद्दल जनजागृती केली जाते. त्यासाठी महिलांचे समूह, गावपातळीवर ग्राम आरोग्य पोषण समितीच्या माध्यमातून आशा कर्मचारी हिपॅटायटीसची माहिती देतात. याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या माता बैठकांत मातांना माहिती दिली जाते. 'हिपॅटायटीस बी' संदर्भात मार्गदर्शन करून जनजागृती सुरू आहे. प्रत्येक गावात आरोग्य भिंत तयार केली असून, त्‍या माध्यमातून जनजागृती केली जाते आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात दर वर्षी कार्यक्रम घेताना माहिती नागरिकांपर्यंत पोचविली जाते. 'हिपॅटायटीस बी' हा एचआयव्हीसारखा पसरतो आणि तो कर्करोगाला निमंत्रण देणारादेखील ठरू शकतो. याचबरोबर 'हिपॅटायटीस ए' आणि 'हिपॅटायटीस ई' हा पाण्यातून पसरणारा आहे. त्यामुळे प्रत्येक गावाची पाण्याची तपासणी केली जात आहे. 

चार वर्षांत रुग्ण न आढळल्याची नोंद 

नाशिक जिल्ह्यात २०१३ मध्ये हिपॅटायटीसचे तब्‍बल ६२ रुग्ण पालखेड (ता. निफाड) येथे आढळले होते. तर २०१५ मध्ये ‘हिपॅटायटीस ई’चे तब्‍बल ४१ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये २०१६, २०१७, २०१८ आणि २०१९ अशा चार वर्षांत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हिपॅटायटीस ए आणि ई आउटब्रेक झालेला नसल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. एकात्मिक जिल्हा सर्वेक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून हिपॅटायटीसचे सर्वेक्षण केला जात असते. 

गेल्‍या चार वर्षांत हिपॅटायटीसचा ऑउटब्रेक नाशिक जिल्ह्या‍त बघायला मिळालेला नाही. बाळ जन्‍माला आल्‍यानंतर चोवीस तासांच्‍या आत लसीकरण केले जात असल्‍याने त्‍यांना हिपॅटायटीसचा धोका टळतो आहे. पिण्याच्‍या पाण्याच्‍या गुणवत्तेवर पुराच्‍या कालावधीत व पावसाळ्याच्‍या दिवसांत विशेष लक्ष दिले जाते. - डॉ. धवल साळवे, सहाय्यक जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा परिषद, नाशिक  

(संपादन - किशोरी वाघ)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT