worried about bad breath these tips help you lifestyle marathi news 
health-fitness-wellness

घामापासून येणाऱ्या दुर्गंधीपासून तुम्ही चिंताग्रस्त असाल तर 'या' टिप्स तुम्हाला करतील मदत

अर्चना बनगे

कोल्हापूर:  उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढू लागते. उन्हाळ्यामध्ये शरीराच्या अनेक समस्या निर्माण होतात. जसे डीहायड्रेशन,उष्णतेचा त्रास, रेसएज असे. परंतु यापेक्षा एक वेगळी समस्या आपल्याला नेहमीच त्रास करते आणि ती म्हणजे शरीराची दुर्गंधी. काही लोकांना ही समस्या इतकी गंभीर असते की ते कोणाजवळ जाऊन बसणे सुद्धा मुश्किल होते. जे लोक नेहमी जास्त तिखट खातात किंवा अंगाने जाड आहेत अथवा कोणत्यातरी हार्मोन्सचा  त्यांना त्रास आहे तर अशा व्यक्तींच्या मध्ये ही समस्या अधिक जाणवते.

घामाच्या दुर्गंधीपासून जे लोक त्रस्त असतात ते जास्त करून डिओडंट पावडर वापरतात. परंतु हा उपाय योग्य नाही. अनेक वेळा ही दुर्गंधी जादाच वाढत जाते. पाय, अंडर आर्म, पोट या ठिकाणापासून दुर्गंधी सुरू होते. ही समस्या इतकी वाढत जाते की आपण या पासून मुक्त झाले पाहिजे असे अनेकांना वाटते. मिस इंडिया स्पर्धेमध्ये प्रशिक्षण देणारे एक्सपर्ट डायटीशियन अंजली मुखर्जी यांनी इंस्टाग्राम अकाउंट वर या समस्येसाठी काही उपाय सांगितले आहेत. अंजली या सुमारे वीस वर्षे या क्षेत्रात काम करतात व ते डायट एक्सपर्ट आहेत. अश्याच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे.

या टीप्‍सने कमी होईल दुर्गंधी

अंगाची दुर्गंधी ही समस्या अनेक लोकांची असते यावर कोणताही कोणतेही औषध नाही. परंतु आपल्या लाईफ स्टाईलमध्ये मध्ये काही टिप्स चा वापर करून ही दुर्गंधी आपण कमी करणे आवश्यक आहे.
 
1) असे पदार्थ खावा ज्यामध्ये कमी दुर्गंधी असेल
ज्या खाद्यपदार्थांमध्ये अधिक सुगंधीतपणा किंवा अधिक दुर्गंधी असते असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची दुर्गंधी अधिक वाढते. उदाहरणात जर आपल्या जेवणामध्ये मासे, लसून, कांदा, मसाले असे पदार्थ ज्यादा असतील तर हे पदार्थ आपल्या घामा साठी अधिक कारणीभूत ठरतात. याच बरोबर आपल्या पायातून ही अधिक दुर्गंधी अशा पदार्थाच्या सेवनाने होते, असे मत अंजली मुखर्जी यांचे आहे.


2) भरपूर पाणी प्या

अनेक समस्यांचे कारण  पाण्याचा कमी वापर  असू शकते. जर तुम्ही आवश्यक तेवढे पाणी पिला नाही तर शरीर गरम होते आणि जादा घाम बाहेर पडतो.


3) धने आणि पुदिनाचे पाणी करेल मदत

अंजली यांनी एका पेयाची माहिती दिली आहे जे धने आणि पुदिना पासून तयार होऊ शकते.


आवश्यक साहित्य 
अर्धा कप धने, 
अर्धा कप पुदिना, 
काळे मीठ, 
लिंबू, 
जरुरीनुसार पाणी

 लिंबाचा रस काढून वरील सर्व पदार्थ मिक्सर मध्ये घाला आणि तयार झालेला पदार्थ आपल्या जेवणामध्ये अथवा पाण्यात घालून नियमितपणे वापरा अंजली यांच्या मते असे पेय आपली दुर्गंधी कमी होण्यासाठी मदत करते.

शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी ही लाईफस्टाईल तुम्हाला मदत करेल
दररोज अंघोळ करा आणि चांगल्या गुणवत्तेचा डिओड्रंट वापरा.
 ताजे फळ नियमितपणे खा.
 पाय स्वच्छ धुऊन घ्या आणि एका दिवसासाठी एकच पाय मोजे वापरा ते पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरू नका .
चमचमीत पदार्थ पासून दूर राहा.
 उन्हाळ्यामध्ये  कॉटन तसेच नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या कपड्यांचा वापर करा.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT