You may have these diseases if having problem of bleeding gums  
health-fitness-wellness

हिरड्यांमधून रक्त येतंय? जरा थांबा. हे असू शकतं शरीरातील अनेक रोगांचं लक्षण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपण नेहमीच थंड, गरम, तिखट, आंबट असे पदार्थ खात असतो. असे पदार्थ खायला कोणाला आवडणार नाही? मात्र अनेकांना अति गरम खाल्ल्यामुळे किंवा अति थंड खाल्ल्यामुळे तोंडाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एका विशिष्ट्य वयानंतर दातांसंबंधीच्या समस्या येणं हे काही नवीन नाही. मात्र आजकालच्या काळात कुठल्याही वयाच्या व्यक्तीला हिरड्यांसंबंधीच्या समस्या जाणवतात. हिरड्यांमधून सतत रक्त येणं ही समस्या नेहमीच अनेकांना जाणवते. यावर आपण नेहमीच घरघुती उपाय करण्याचा प्रयत्न करतो. मात्र ही समस्या तुम्हाला नेहमी जाणवत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. हिरड्यांमधून रक्त येणं हे अनेक आजारांचं लक्षण असू शकतं. याचबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

या कारणांमुळे येऊ शकतं हिरड्यांतून रक्त

व्हिटॅमिन 'सी'ची कमतरता
 
जर तुमच्या हिरड्यांमध्ये सतत रक्तस्त्राव होत असेल किंवा हिरड्यांमध्ये सूज येत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन 'सी'ची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन 'सी'मुळे अनेक आजार बरे होतात तसंच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. त्यामुळे जर तुमच्या हिरड्यांना त्रास होत असेल तर व्हिटॅमिन 'सी' युक्त फळं जसं की लिंबू, संत्री, मोसंबी यांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा. 

व्हिटॅमिन 'के'चा प्रादुर्भाव 

तुमच्या शरीरात जर व्हिटॅमिन 'के'ची कमतरता असेल तर तुम्हाला हिरड्यांमधून रक्त येणं किंवा सूज येणं अशाप्रकारच्या समस्या येऊ शकतात. व्हिटॅमिन के आपल्या शरीरातील रक्तात निर्माण होणाऱ्या क्लॉटिंग्ससाठी महत्वाचं असतं. म्हणूनच दररोज पत्ताकोबी, बिट, मासोळी अशाप्रकारच्या व्हिटॅमिन के युक्त  करणं महत्वाचं आहे. 

यकृतासंबंधीचे रोग 

सिरॉसिस हा यकृतासंबंधीचा रोग अधिक प्रमाणात दारू पिणाऱ्यांना किंवा फॅटी लिव्हर असणाऱ्या लोकांना होतो. हा रोग असल्यास हिरड्यांमधून रक्त येण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान करू नका आणि स्वतःच्या यकृताकडे लक्ष द्या. 

हिरड्यांचे आजार

हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तुम्हाला हिरड्यांचे आजार असू शकतात. रक्त सतत येत असल्यास पॅरिओडेन्टीटीस हा हिरड्यांसंबंधीचा आजार तुम्हाला असण्याची शक्यता आहे. तसंच हा आजार अधिक प्रमाणात वाढल्यास तुम्हाला जिंजवॉयटिस नावाचा आजारही होऊ शकतो. म्हणूनच हिरड्यांना मजबूत ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. तसंच दिवभरातुन २-३ वेळा ब्रश करणंही महत्वाचं आहे.

कँसर 

कँसर या आजारातही हिरड्यांमधून रक्त येणं ही समस्या निर्माण होते. किमोथेरपी घेणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना हिरड्यांवर सूज आणि रक्त येण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी चांगला आहार घ्या. ज्यामुळे तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारचे रोग होणार नाहीत. 

( डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT