Yoga Tips esakal
आरोग्य

Yoga Tips : ताण-तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत ‘ही’ योगासने, दररोज फक्त १० मिनिटे करा सराव

Yoga Tips : सततचा तणाव आणि चिंता वाढल्यामुळे नैराश्य येऊ शकते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही उपायांची मदत घेऊ शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : सध्याचे धावपळीचे जीवन, व्यस्त जीवनशैली, कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे, अनेकांना मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य जाणवू लागते. या शिवाय, एकटेपणा अन् ताण-तणावामुळे देखील मूड खराब होऊ शकतो.

सततचा तणाव आणि चिंता वाढल्यामुळे नैराश्य येऊ शकते. परंतु, हा ताण-तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काही उपायांची मदत घेऊ शकता. जसे की, नियमित व्यायाम, निरोगी खाण्याच्या सवयी, पुरेशी विश्रांती आणि योगामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

नियमित योगासनांचा सराव केल्याने मन आणि मेंदू शांत राहते. योगासनांमध्ये अशी काही योगासने आहेत की, ज्यांचा दररोज १० मिनिटे सराव केल्याने मानसिक विकार, तणाव, चिंता आणि मूड स्विंग्स बरे होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबद्दल.

सूखासन

तणाव कमी करण्यासाठी सूखासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. १० मिनिटांमध्ये होणारे हे योगासन दररोज केल्याने तुमचा ताण-तणाव दूर होण्यास मदत होऊ शकते. या योगासनाचा सराव केल्याने मेंदू आणि मन शांत राहण्यास मदत होते. या व्यतिरिक्त सूखासनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. हे योगासन करायला अतिशय सोपे आहे.

बालासन

ताण-तणावाची सुट्टी करण्यासाठी हे योगासन सर्वोत्तम आहे. बालासनाचा दररोज सराव केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. बालासनाचा दररोज सराव केल्याने केवळ मानसिक ताण कमी होत नाही तर, शारिरीक ताण ही कमी होतो.

शिवाय, या योगासनाचा सराव केल्याने शरीर ताणले जाते आणि मूड सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या या योगासनाचा सराव सर्व वयोगटातील व्यक्ती करू शकतात. हे योगासन करायला देखील अतिशय सोपे आहे. या योगासनाचा सराव केल्याने ताण-तणाव तर दूर होतोच शिवाय, पाठदुखीपासून ही आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT