First Aid
First Aid  google
आरोग्य

First Aid : या ८ कारणांसाठी तुम्हाला प्रथमोपचार करता आलेच पाहिजेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : प्रथमोपचार प्रशिक्षण कोणत्‍याही वेळी उद्भवू शकणाऱ्या आपत्‍कालीन स्थितीचा सामना करण्‍यासाठी आवश्‍यक आहे. हे प्रशिक्षण व्‍यक्‍तीला दुखापतींवर प्रथमोपचाराची माहिती देते, ज्‍यामुळे गंभीर जखमी झालेल्‍या किंवा आजारी असलेल्‍या व्‍यक्‍तीचे जीवन वाचण्‍याची शक्‍यता वाढते.

रुग्णालयात दाखल करण्याची आवश्‍यकता आहे की नाही याबाबत माहिती देण्‍यासोबत प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्‍येकासाठी आवश्‍यक आहे. तसेच, हे प्रशिक्षण व्‍यक्‍तीला आपत्‍कालीन स्थितीची हाताळणी करण्‍याचा आणि त्‍वरित कृती करण्‍याचा आत्‍मविश्‍वास देईल, ज्‍यामुळे ते कोणत्‍याही संभाव्‍य पीडितांचे जीव वाचवू शकतील.

तुम्हाला प्रथमोपचार माहितीच असायला हवेत यामागची कारणे सांगत आहेत फोर्टिस हॉस्पिटलच्‍या इमर्जन्‍सी मेडिसीनचे संचालक डॉ. संदीप गोरे. (8 reasons you must know first aid)

प्रत्‍येक व्‍यक्‍तीने प्रथमोपचार प्रक्रिया जाणून घेण्‍यासोबत तसे करण्‍यास इतरांना देखील का प्रेरित करावे याची आठ कारणे पुढे देण्‍यात आली आहेत.

१. जीवन वाचते

वैद्यकीय सेवा येईपर्यंत आपत्‍कालीन स्थितीत दुखापतग्रस्‍त व्‍यक्‍तीची त्‍वरित काळजी घेणे किंवा त्‍यांना साहाय्य करणे जीवनदायी कृती ठरू शकते. अशा स्थितीत लवकरात लवकर दुखापतग्रस्‍त व्‍यक्‍तीला स्थिर करणे जीवन वाचवण्‍यासाठी महत्त्वाचे आहे.

२. आरोग्‍य खालावण्‍याची शक्‍यता कमी होते

मुलभूत प्रथमोपचार माहीत असणे कोणत्‍याही संभाव्‍य पीडितासाठी जीवनदायी बनू शकते. आपत्‍कालीन स्थितीत आरोग्‍य अधिक खालावणे टाळण्‍यासाठी वेळेवर कृती करणे आवश्‍यक आहे, यामुळे स्थिती अधिक गुंतागुंतीची होण्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होऊ शकते. यामुळे व्‍यक्‍तीचे आरोग्‍य खालावण्‍याची शक्‍यता देखील कमी होते आणि कोणतीही दीर्घकालीन किंवा तात्‍पुरती विकृती होण्‍यास प्रतिबंध होतो.

३. हॉस्पिटलला अनावश्‍यक भेटी कमी होतात

प्रत्‍येक अपघात किंवा दुर्घटनेसाठी हॉस्पिटलायझेशन किंवा तज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता नसते. गुडघ्‍याला झालेली दुखापत, डोक्‍याला झालेली दुखापत किंवा पायाचा घोटा लचकणे यांसारख्‍या दुखापती आइसपॅक, बँडेज लावणे, मसाज इत्‍यादींसारख्‍या योग्‍य प्रक्रिया व घटकांसह व्‍यवस्‍थापित करता येऊ शकतात.

४. संसर्गाला प्रतिबंध होऊ शकतो

एखाद्या व्‍यक्‍तीचा अपघात होतो तेव्‍हा शरीराचा जखमी भाग हवा, पाणी किंवा धूळ यांच्‍या संपर्कात येतो, ज्‍यामुळे संसर्ग होऊन स्थिती अधिक बिकट होऊ शकते. म्‍हणून शुद्ध पाणी, साबण, बँडेज व पेट्रोलियम जेलीचा वापर करणे आवश्‍यक आहे. यांचा योग्‍यरित्‍या व पुरेसा वापर केल्‍यास संसर्गाचा धोका कमी होईल आणि जखम लवकर बरी होईल.  

५. चिंता कमी होते

जीवन कधी-कधी अत्‍यंत अनपेक्षित असू शकते. प्रथमोपचार कौशल्‍ये माहीत असल्‍यास व्‍यक्‍तीच्‍या प्रियजनासह आपत्‍कालीन स्थितीची हाताळणी करण्‍याबाबत भिती व चिंता कमी होते, तसेच त्‍यांना शांत ठेवण्‍यास आणि स्थितीला योग्‍यरित्‍या हाताळण्‍यास मदत होते.

६. मुलांच्‍या सुरक्षिततेची खात्री मिळते

मुले किंवा लहान मुले नेहमी आसपास धावत असतात आणि त्‍यांना पडणे, जखम होणे, गुदमरणे इत्‍यादी सारख्‍या सामान्‍य वैद्यकीय आपत्‍कालीन स्थि‍तीचा अनुभव येतो. नवजात बालक देखील असुरक्षित आहेत आणि सीझर्स सारख्‍या स्थितीपासून त्‍यांना असहज वाटू शकते.

म्‍हणून पालकांनी मुलांच्‍या सुरक्षिततेला धोका पोहाचू शकतील असे थोडे खरचटणे किंवा लक्षणीय सीझर्स यांचा सामना करण्‍यासाठी प्रथमोपचार कौशल्‍ये जाणून घेणे आवश्‍यक आहे.

७. संवाद महत्त्‍वाचा आहे

आपत्‍कालीन स्थितीची हाताळणी आणि दुखापतग्रस्‍त व्‍यक्‍तीला मार्गदर्शन करणे वैद्यकीय सेवा येईपर्यंत महत्त्वाचे आहे. तसेच व्‍यक्‍ती दुखापतग्रस्‍त कशी झाली आणि त्‍याची विद्यमान स्थिती याबाबत डॉक्‍टरला सविस्‍तरपणे सांगणे आवश्‍यक आहे. यामुळे वैद्यकीय टीमला त्‍याअनुषंगाने कृती करण्‍यास आणि उपचार प्रक्रियेला गती देण्‍यास मदत होईल.

८. सुसज्‍ज राहा

जीवन अनपेक्षित घटना व स्थितींनी भरलेले आहे. व्‍यक्‍तीचे प्रियजन हृदयाचा झटका, स्‍ट्रोक, दम्‍याचा झटका किंवा रक्‍तस्राव यांसारख्‍या संभाव्‍य गंभीर गुंतागुंतीसह आजारी पडू शकतात, ज्‍यासाठी त्‍वरित कृतीची गरज भासू शकते.

त्‍यांना नकळतपणे भाजणे, जखम होणे, झटके येणे व चक्‍कर येणे हे देखील होऊ शकते. व्‍यक्‍तीला प्रथमोपचार माहीत असेल तर ते अशा स्थितीला प्रभावीपणे हाताळू शकतात, ज्‍यामुळे रूग्‍णाचे जीवन वाचू शकते.

थोडक्‍यात, पुरेसे प्रथमोपचार माहिती असल्‍याने आपल्‍याला स्‍वत:सोबत, आपले मित्र व आपल्‍या कुटुंबियांची काळजी घेता येते. आपत्‍कालीन स्थिती घरी, कामाच्‍या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी उद्भवू शकते.

प्रथमोपचार जाणून घेणे आणि संभाव्‍य धोके व वैद्यकीय समस्‍यांबाबत दक्ष राहणे यामुळे आपल्‍यामध्‍ये आरोग्‍याबाबत जागरूकता वाढते, तसेच आपल्‍याला दुसऱ्या व्‍यक्‍तीचे जीवन वाचवता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT