surgery  esakal
आरोग्य

तब्बल 5 शस्त्रक्रियांनंतरही त्रास कमी होईना; अखेर डॉ. शिंदेंच्या प्रयत्नांना यश

व्याधी कोणतीही असो त्यावर केवळ शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे नसून ती शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष कौशल्य वापरून यशस्वी झाली पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : व्याधी कोणतीही असो त्यावर केवळ शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे नसून ती शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष कौशल्य वापरून यशस्वी झाली पाहिजे, तरच तो रुग्ण पिडामुक्त होऊ शकतो, याचा प्रत्यय नुकताच डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये हर्नियाची सहाव्यांदा यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला आला आहे. (Latest Marathi News)

या हार्निया झालेल्या ६० वर्षीय रुग्णावर यापूर्वी इतर ठिकाणी पाच वेळा शस्त्रक्रिया होऊनही त्याची पीडा कमी होत नव्हती. यामुळे प्रचंड भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती. दिलीप बाळू पाटील (वय ६०, रा. जळगाव) असे या पीडित रुग्णाचे नाव असून, गेल्या काही दिवसांपासून तो हर्नियाच्या आजाराने प्रचंड त्रासला होता. त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतले. मात्र त्यांच्यावर काहीएक फरक पडत नव्हता. एकाच दुखण्यावर तीन वेगवेगळ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर पाच वेळेस हार्नियाची शस्त्रक्रिया केली होती, तरीही फरक काही पडला नसल्याने रुग्णाने बरे होण्याची आशाच सोडली होती.

अखेर नातलगांच्या सांगण्यावरून त्यांनी अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये उपचार घेण्यास सुरवात केली. डॉ. अनिल शिंदे यांनी त्यांची सपूर्ण माहिती जाणून घेऊन घेत पुन्हा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. सुमारे पाच तास ही शस्त्रक्रिया चालली. यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. महेश पाटील व स्टाफचे सहकार्य लाभले. अखेर डॉ. शिंदे यांनी रुग्णास कायमचे पिडामुक्त केल्याने नातलगांनी व रुग्णाने डॉक्टरांचे विशेष आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT