Eyes Air Pollution Effect  esakal
आरोग्य

Eyes Air Pollution Effect : प्रदूषणामुळे डोळ्यांना जळजळ होते? या 5 टीप्स ठरतील लाभदायक

आपल्याकडे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालल आहे

सकाळ डिजिटल टीम

Eyes Air Pollution Effect : आपल्याकडे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालल आहे; प्रदूषणाने भयंकर रूप धारण केल आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसून येता आहेत. प्रदूषणाचा मोठा फटका बसतो तो आपल्या डोळ्यांवर. प्रदूषणामुळे डोळ्यांना खूप गंभीर दुखापतही होऊ शकते.

प्रदूषणाचा त्रास नेहमीच असतो, पण ऑक्टोबर महिन्यापासून पुढे हवेची गुणवत्ता खालावू लागते. जणू काही आभाळाने प्रदूषणाची चादर पांघरली आहे. प्रदूषणामुळे श्वास घेतांना त्रास होण, डोळ्यात जळजळ होण अशा आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी सुरू होतात. हवेच्या प्रदूषणामुळे आजकाल प्रत्येकाच्या डोळ्यांना जळजळ जाणवते आहे.

प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे

1. डोळे थंड पाण्याने धुवा : डोळ्यांना काही त्रास होत असेल तर डोळे थंड पाण्याने धुवावेत. प्रदूषणामुळे तुम्हाला जळजळ होत असेल तर तुम्ही तुमचे डोळे वारंवार थंड पाण्याने धुवावेत. कारण या कार्बन ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडच्या उच्च एकाग्रतेमुळे असा त्रास होऊन चिडचिड होते.

2. चष्मा किंवा गॉगल वापरा : जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना वायू प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही बाहेर जाताना गॉगल वापरा यामुळे डोळ्यांचे संरक्षण होईल. प्रदूषणाचा थेट परिणाम डोळ्यांवर होणार नाही.

3. स्क्रीन डिवायसेस पासून दूर राहा : डोळ्यांना जास्त त्रास होत असेल, तर डोळ्यांना विश्रांती द्या. अगदी ऑफिस मध्ये असाल तरी पाच दहा मिनिट ब्रेक घ्या. आवश्यक असेल तेव्हाच फोन किंवा कॉम्प्युटर वापरा. यासोबतच भरपूर पाणी प्या.

4. हेल्दी फूड खा : वायू प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही हेल्दी फूडही खाणे महत्वाचे आहेत. यामुळे आपल्या शरीराची इम्मुनिटी वाढते. आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा, ज्यात भरपूर जीवनसत्त्वे आहेत आणि तुमच्या डोळ्यांनाही फायदा होईल. काकडी, गाजर, हिरव्या पालेभाज्या खा.

5. डोळ्यांचा मेकअप करू नका : जर तुम्ही बाहेर जात असाल तर यावेळी डोळ्यांचा मेकअप टाळा, कारण मेकअप आणि प्रदूषण दोघंही डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात. डोळ्यांना खाज सुटू शकते आणि डोळ्यांना हानी पोहोचते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Pimpri: विनापरवाना उभारली तीनमजली इमारत; मोशीतील बांधकामाबाबत अनेक प्रश्न, जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT