आरोग्य

जास्त साबण लावल्याने खरचं शरीरावर पांढरे डाग पडतात का? जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

शरीरावर पांढरे डाग पडणे याला त्वचारोग किंवा ल्युकोडर्मा असेही म्हणतात. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. हा त्वचेचा आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर किंवा हात-पायांवर पांढरे डाग पडू लागतात. याविषयी लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी दरवर्षी 25 जून रोजी जागतिक त्वचारोग दिन साजरा केला जातो. त्वचारोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा यामागचा उद्देश आहे. त्वचारोगाशी संबंधित 4 सर्वात मोठ्या समजांबद्दलचं सत्य जाणून घ्या…

भारतात दरवर्षी त्वचारोगाची १ लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात. त्वचारोग कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु तो सामान्यतः तिशीच्या आधी अधिक दिसून येतो. हे अनेक प्रकारचे असतात. काही लोकांमध्ये हे पांढरे डाग शरीराच्या एका भागात दिसतात. त्याच वेळी, काही रुग्णांमध्ये हे पांढरे डाग हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतात. हा आजार बरा होतो. याबाबत अनेक गृहितकं आहेत, त्यामुळे त्वचारोगाच्या रुग्णांनाही मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या समजुतींबदद्लचं खरं सत्य सांगत आहोत.

मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने पांढरे डाग पडतात. हे अजिबात खरे नाही.शरीरावरील पांढरे डाग आणि मासे-दूध यांचा संबंध आहे, असं सांगणारा कोणताही अभ्यास झालेला नाही. हा रोग एक ऑटोइम्यून डिसऑर्डर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्याचा जेवणाच्या कॉम्बिनेशनवर परिणाम होत नाही. ऑटोइम्यून ही अशी स्थिती असते, जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील निरोगी पेशींवर हल्ला करू लागते

त्वचारोग होण्याचे नेमके कारण काय आहेत ?

• रोगप्रतिकारक प्रणालीचा विकारामुळे तुम्हाला त्वचारोग होऊ शकतो.

• आनुवंशिकतामुळे देखील तुम्हाला त्वचारोग होऊ शकतो.

• जास्त मानसिक ताण घेतल्याने सुध्दा तुम्हाला त्वचारोग होऊ शकतो.

• त्वचेला आघात झाल्यास तुम्हाला त्वचारोग होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

SCROLL FOR NEXT