Pediatrician warning on artificial food dyes sakal
आरोग्य

Kids Health Alert: कृत्रिम खाद्य रंग मुलांसाठी ठरतोय 'स्लो पाॅइझन'? काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन

Are artificial food colors harmful for children: चमकदार रंगीत अन्न मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, बालरोगतज्ज्ञांचा इशारा!

सकाळ वृत्तसेवा

Pediatrician warning on artificial food dyes: सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. लहानांपासून तर ज्येष्ठांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत मोठा बदल झाला आहे. अपुरा वेळ आणि आळस यामुळे घरगुती अन्नपदार्थांपेक्षा प्रोसेस्ड फूड किंवा बाहेरून अन्नपदार्थ मागवण्यात येतात. याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होत आहे.

बाहेरच्या खाद्यपदार्थांमध्ये अन्नातील कृत्रिम रंग म्हणजे आर्टिफिशिअल फूड कलरचा मोठा वापर होत असून, हे साऱ्यांसाठी स्लो पाॅयझन ठरू शकते. काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.

खाद्यपदार्थांचा रंग आणि चव सुधारण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र या कृत्रिम खाद्यरंगामुळे कर्करोगासारख्या गंभीर रोगांची जोखीम असल्याचे संजीवनी बाल रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील म्हणाले. खाद्यपदार्थांचा रंग आणि चव सुधारण्यासाठी कृत्रिम खाद्य रंगाचा म्हणजे आर्टिफिशिअल फूड कलरचा वापर केला जातो. पण काही अहवालानुसार अतिसेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका असतो.

  • सकस आहार निवडावा

  • घरी शिजवलेले अन्न खावे

  • घरगुती अन्नपदार्थ खावे

  • पॅकबंद अन्नापासून शक्यतो दूर राहावे

कृत्रिम खाद्यरंगाचे तोटे

  • पदार्थांमध्ये बेंझिन आढळते यामुळे कार्सिनोजेन आजारांना आमंत्रण मिळते

  • फूड कलरयुक्त पदार्थाचे अतिसेवन कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची जोखीम

  • कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यात अडचण येण्याची जोखीम

  • कृत्रिम फूड कलरमुळे ॲलर्जीची समस्या उद्भवू शकते

लाल रंगासाठी बिटाचा अर्क, पिवळ्या रंगासाठी हळद, हिरव्या रंगासाठी क्लोरोफिल हे नैसर्गिक खाद्यरंग आहेत. मात्र कृत्रिम खाद्य रंगातील पदार्थ प्रक्रिया केलेले असतात. सुंदर, लोभस दिसत असले तरी कृत्रिम खाद्यरंग रासायनिक असतात. या पदार्थामुळे आरोग्यविषयक समस्या येतात. कृत्रिम खाद्यरंग ( डाईज) हे मिठाई, शीत पेयांपासून ते पॅक स्नॅक्सच्या पदार्थातून शरीरात जातात. यामुळे कृत्रिम रंग आणि नैसर्गिक रंगातील फरक जाणून मुलांच्या आहाराबाबत पालकांनी जागरूक असावे.

- डॉ. राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT