Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : तुम्हीही कामाच्या नादात ८ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहता काय? जाणून घ्या तोटे

तुम्हाला कामातून उठण्यास अजिबात वेळ मिळत नसेल आणि त्यामुळे तुम्ही तासंतास बसून राहात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

साक्षी राऊत

Health Tips : हल्ली हेल्दी लाइफस्टाइल जगणे पूर्वीच्या तुलनेत जास्त चॅलेंजिंग झाले आहे. तुम्हीही रोज ८ तासांपेक्षा जास्त काम करत असाल तर आरोग्यासाठी ते धोक्याचे ठरू शकते. तुम्हाला कामातून उठण्यास अजिबात वेळ मिळत नसेल आणि त्यामुळे तुम्ही तासंतास बसून राहात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

काय आहे सिटिंग पांडेमिक?

जेव्हा तुम्ही ८ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच पोझिशनमध्ये बसून असता तेव्हा तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देत असता. तुमचे काम ८ तासांचे असले तरी आठ तास एकाच कंडिशनमध्ये बसून राहण्याने बऱ्याच शारीरिक समस्या उद्भवतील.

नुसत्या बसण्यामुळे होणारे शारीरिक त्रास कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता

अधेमधे उठून थोडं वॉक करा. एका तासानंतर ५ मिनिट वॉक करा. असे करून तुम्ही ब्लड प्रेशर आणि शुगर दोन्ही नियंत्रित करू शकता.

बसण्याची योग्य पद्धत

पोट काढून, मान झकवून बसल्यानेशारीरिक त्रास वाढतील. तेव्हा योग्य पद्धतीने बसा. पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. फार वेळ या पोजिशनमध्ये बसून थकलात की थोड्या वेळ वॉक करा.

स्ट्रेच करा

काही वेळाने तुमचे हात, मान आणि पाठ स्ट्रेच करा. ज्यामुळे मांसपेशी लवचिक होतील आणि शरीर अॅक्टिव्ह राहील. (Lifestyle)

डोळे बंद करून आराम करा

दर तासाला काही सेकंद किंवा मिनिटे डोळे बंद करून आपले डोळे आणि मन शांत करा. यामुळे मानसिक शांतीही मिळते आणि मन पुन्हा एकाग्र होण्यास मदत होते.

व्यायाम करा

तज्ज्ञांच्या सूचनेनुसार दररोज काही व्यायाम करा. जेणेकरून बसल्यामुळे सुरू झालेल्या सर्व समस्या औषधाविना बऱ्या होऊ शकतील.

लक्ष न दिल्यास काय होईल?

जर तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही, तर सतत बसून राहणे तुम्हाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते. एकाच पोजिशनमध्ये सतत बसल्याने तुमची क्रिएटिव्हीटी कमी होते, तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही, थकवा जाणवतो आणि तुमचे कामही तुम्ही नीट करू शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT