soft drink  soft drink
आरोग्य

सावधान! सॉफ्ट ड्रिंक्स सेवनाची तुम्हाला सवय आहे? 'या' स्वीटनरमुळं होऊ शकतो कॅन्सर

WHO नं याबाबत इशारा दिला असून याच्या बंदीची घोषणा होऊ शकते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोका कोला, पेप्सी किंवा इतर कार्बोनेटेड पेये, च्युंइगम्सच्या सेवनाची तुम्हाला सवय असेल तर त्याचा वापर करणं थांबवा. कारण यातील एका स्वीटनरमुळं कॅन्सर होऊ शकतो. याबाबत जागतीक आरोग्य संघटनेनं यापूर्वीच इशारा दिला होता. यावर सध्या चाचण्या सुरु असून लवकरच यावर बंदीची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे. (Artificial sweetener aspartame in Coca-Cola and other soft drinks may cause cancer says WHO)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या कृत्रिम गोड पदार्थांपैकी एस्पार्टम हे एक स्वीटनर आहे. या पदार्थाला पुढील महिन्यापर्यंत कार्सिनोजेन म्हणून घोषित केलं जाईल. जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे याची घोषणा केली जाईल. डब्ल्यूएचओने कृत्रिम स्वीटनर्सच्या वापराविरुद्ध इशारा दिल्यानंतर एक महिन्यानंतर ही बाब समोर आली आहे. सध्या इंटरनेटवर एस्पार्टम प्रचंड ट्रेंड करत आहे, पण ते नेमकं काय आहे जाणून घेऊयात.

एस्पार्टम म्हणजे काय?

एस्पार्टम हे बाजारातील सर्वात लोकप्रिय नॉन-न्यूट्रिटिव्ह स्वीटनर्स (NNS) पैकी एक आहे. हा पदार्थ जेवण, कमी उष्मांक आणि शुगर फ्री असं लेबल असलेल्या उत्पादनांमध्ये देखील वापरलं जातं. हा एक गंधहीन पावडरचा प्रकार आहे ज्याचा रंग पांढरा आहे. जो सामान्य साखरेपेक्षा 200 पट गोड आहे. खरंतर हा गोडवा खूपच अधिक आहे.

हेल्थलाइनच्या माहितीनुसार एस्पार्टममधील मुख्य घटक अस्पार्टिक अॅसिड आणि फिनिलॅनानिन आहेत. हे दोन्ही नैसर्गिकरित्या तयार होणारे अमीनो अॅसिड आहेत, जे प्रथिनांचे 'बिल्डिंग ब्लॉक्स' म्हणून ओळखले जातात. शिवाय, फूड इनसाइटनुसार, एस्पार्टम पचन झाल्यावर थोड्या प्रमाणात मिथेनॉल तयार करते. जे एक संयुग असून नैसर्गिकरित्या फळे, भाज्या आणि त्यांच्या रसांत ते असते.

याव्यतिरिक्त, अनेक शुगर फ्री उत्पादनांमध्ये साखरेचा पर्याय म्हणून एस्पार्टमचा वापर केला जातो. जे दही, नो-शुगर एनर्जी बार, शुगर फ्री आईस्क्रीम इत्यादी पदार्थांमध्ये देखील वापरले जाते. दरम्यान, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननं (FDA) सन 1981मध्ये अन्न आणि पेयांमध्ये एस्पार्टमचा वापर करण्यास मान्यता दिली होती.

रॉयटर्सच्या माहितीनुसार, WHOची कर्करोग संशोधन शाखा असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरद्वारे (IARC) जुलैमध्ये या एस्पार्टमला 'संभाव्यत: मानवांसाठी कर्करोगजन्य' म्हणून नोटिफाय केलं जाणार आहे. IARC आणि संयुक्त संस्था तज्ज्ञ समिती 'ऑन फूड अॅडिटीव्ह्ज' (JEFCA) सध्या एस्पार्टमचे परिणाम आणि सुरक्षिततेचा आढावा घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT