Autistic Pride Day 2024  esakal
आरोग्य

Autistic Pride Day 2024 : ऑटिझम आजार नेमका काय आहे? जाणून घ्या 'ही' लक्षणे

Autistic Pride Day 2024 : जगभरात दरवर्षी १८ जून हा दिवस ‘ऑटिस्टिक प्राईड डे’ म्हणून साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Autistic Pride Day 2024 : जगभरात दरवर्षी १८ जून हा दिवस ‘ऑटिस्टिक प्राईड डे’ म्हणून साजरा केला जातो. ऑटिझम या आजाराविषयी लोकांना जागरूक करणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. या आजाराबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी २००५ मध्ये सर्वात आधी हा दिवस साजरा करण्यास सुरूवात करण्यात आली.

ऑटिझम हा आजार नसून एक प्रकारची स्थिती आहे. या आजाराची लक्षणे लवकर दिसून येत नाही. त्यामुळे, व्यक्तीवर उपचार करण्यास विलंब होतो. जर या आजाराची लक्षणे वेळीच लक्षात आली आणि त्यावर त्वरीत उपचार करण्यास सुरूवात केली की, मग या आजारावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे. शिवाय, योग्य उपचार केल्यावर या आजारातून व्यक्ती बरा होऊ शकतो.

आज या ऑटिस्टिक प्राईड दिनानिमित्त आपण हा आजार नेमका काय आहे? आणि याची लक्षणे कोणती? ते जाणून घेणार आहोत.

ऑटिझम आजार काय आहे?

ऑटिझम हा एक असा आजार आहे की, ज्यामध्ये मूल सामाजिकरित्या कनेक्ट होऊ शकत नाही, किंवा त्याच्या भावना इतरांसमोर स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही. या आजारात व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा तर काही प्रकरणांमध्ये गोंधळलेला असतो.

अशा परिस्थितीमध्ये मुलाची वागणूक आणि विकास पाहून डॉक्टर हा आजार ओळखतात. कारण, हा आजार ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी उपलब्ध नाही. ऑटिझम आजाराची लक्षणे साधारणपणे २ वर्षानंतर मुलांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. विशेष म्हणजे वाढत्या वयानुसार आणि लक्षणांच्या आधारे हा आजार ओळखला जातो. या आजाराची समस्या सामान्यपणे १० वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आढळून येते.

ऑटिझम आजाराची लक्षणे कोणती?

  • जन्मानंतर जवळपास २ वर्षांपर्यंत मूल कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाही.

  • भाषेच्या विकासात विलंब होणे.

  • मुलांच्या ग्रुपसोबत खेळायला न आवडणे.

  • एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे.

  • मानसिक उदासीनता.

  • शब्दांचा वापर न करता बडबडणे.

  • सतत एकटेच राहणे.

  • इतरांसोबत मिसळण्यास नकार देणे.

  • बोलण्यात अडथळा येणे.

  • इतरांसोबत संवाद साधताना नाराजी दर्शवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT