Sweeteners  sakal
आरोग्य

Sweeteners : वजन घटविण्यासाठी ‘स्वीटनर्स’चा वापर टाळा

‘डब्ल्यूएचओ’चा सल्ला; दीर्घकालीन वापर घातक, पोषणमूल्यांचा अभाव

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा असंसर्गजन्य रोगांचा धोका कमी करण्यासाठी ‘शुगर फ्री स्वीटनर्स’चा (गोडी निर्माण करणारे घटक) वापर न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा हा सल्ला उपलब्ध पुराव्यांच्या आढाव्याच्या निष्कर्षांवर आधारित आहे. साखरविरहित कृत्रिम स्वीटनरचा (एनएसएस) वापर प्रौढ किंवा मुलांमधील शरीरातील चरबी कमी करण्यासाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरत नाही.

‘एनएसएस’चा दीर्घकालीन वापरामुळे पुढील काळात घातक परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यताही ‘डब्ल्यूएचओ’ने वर्तविली आहे. ‘टाइप टू’ प्रकारचा मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार आणि प्रौढांमधील मृत्युदरात वाढ आदींचा धोका असतो, असे संघटनेने नमूद केले आहे.

वजन नियंत्रणात आणण्यासाठी साखरेऐवजी ‘एनएसएस’चा वापर करणे हे दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरत नाही. ‘शुगरफ्री’चे सेवन कमी करण्यासाठी लोकांनी इतर मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे, जसे फळांसारखे नैसर्गिकरीत्या शर्करा असलेले अन्न किंवा गोडाचा समावेश नसलेले पदार्थ आणि पेये सेवन करणे हितकारक आहे,’ असे ‘डब्ल्यूएचओ’चे (पोषण आणि अन्न सुरक्षा) संचालक फ्रान्सिस्को ब्रान्सा यांनी सांगितले.

ज्यांना मधुमेह आहे, अशा रुग्णांव्यतिरिक्त सर्व लोकांना ‘डब्ल्यूएचओ’च्या शिफारशी लागू आहेत. साखर या गटात न मोडणारे सर्व नैसर्गिक आणि कृत्रिम घटक आणि पोषणमूल्य नसलेले सुधारित स्वीटनर्स यांचा यात समावेश आहे. असे स्वीटनर उत्पादित खाद्यपदार्थ आणि पेये आणि अन्न व पेयांमध्ये घालण्यासाठी ग्राहकांकडून खरेदी केलेले जाते.

सामान्यपणे असेसल्फेम के, अस्पारटेम, ॲडव्हान्टेम, सायक्लेमेटस, निओटेम, सुक्रोलोड, सच्चारिन, स्टिव्हिया आदींना ‘एनएसएस’ म्हणून ओळखले जाते.

‘एनएसएस’ हा आहारातील आवश्‍यक घटक नसून त्यात काहीही पोषणमूल्य नसतात. लोकांनी त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आयुष्याच्या सुरुवातीपासूनच आहारातील गोड पदार्थ कमी केले पाहिजे.

- फ्रान्सिस्को ब्रान्सा, ‘डब्ल्यूएचओ’चे संचालक (पोषण आणि अन्न सुरक्षा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elephant Mahadevi Padayatra : 'महादेवी'साठी हजारो कोल्हापूरकर एकवटले, नेत्यांचा कितपत प्रतिसाद; फलकांनी वेधले लक्ष

Vasai Virar ED Raid : वसई विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि पत्नीला ईडीचे समन्स, ४ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Top Asian Student Cities: आशियामधील टॉप शिक्षण शहरे कोणती? पाहा संपूर्ण यादी!

Daibetes Management: मधुमेहाचे व्यवस्थापन करताना हृदय सुध्दा ठेवा निरोगी, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेले प्रभावी उपाय

अमृता सुभाष आणि अनिता दातेचा गाजलेला जारण सिनेमा होणार 'या' दिवशी ओटीटीवर रिलीज

SCROLL FOR NEXT