Health Tips esakal
आरोग्य

Health: वाचा काय सांगतं एम्स रिसर्च, डायबिटीजसह लठ्ठपणाही कमी करेल या आयुर्वेदिक औषधी

या रामबाण औषधीबाबत तुम्हाला कळलंय काय?

सकाळ डिजिटल टीम

Medicine: मधुमेहासोबतच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणारे आयुर्वेदिक औषध असल्याचे नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या अभ्यासात दिसून आले आहे. वजन कमी करण्याबरोबरच हे औषध तुमची पचनशक्तीही सुधारेल. डॉक्टरांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लठ्ठपणा हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 'BGR-34' असे या औषधाचे नाव आहे.

एम्सच्या फार्माकोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. सुधीर कुमार सारंगी यांच्या देखरेखीखाली केलेल्या तीन वर्षांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, हे औषध मधुमेह आणि लठ्ठपणा या दोन्हींमध्ये फायदेशीर आहे. अभ्यासादरम्यान, BGR-34 ची चाचणी अनेक मधुमेहविरोधी अॅलोपॅथी औषधांसह करण्यात आली होती. हे औषध अ‍ॅलोपॅथीच्या औषधांसोबत दिल्यास परिणाम अधिक परिणामकारक होतात का, हे पाहण्याचा प्रयत्न या अभ्यासातून करण्यात आला होता. आणि त्याचा रिजल्टही चांगला आला. संशोधनात असे दिसून आले आहे की BGR-34 हे एक अतिशय प्रभावी औषध आहे.

BGR-34 हे औषध वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) शास्त्रज्ञांनी अथक संशोधनानंतर तयार केले आहे. पोलंडच्या सायन्स जर्नल 'सेंडो' मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे औषध ग्लायकेटेड हिमोग्लोबिन (HbA1c) देखील नियंत्रणात आणते. त्यात औषधी वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. हे औषध शरीरातील अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाणही वाढवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT