Bad Breath Tips esakal
आरोग्य

Bad Breath Tips : तोंडाला येणाऱ्या वासामुळे लोक तुम्हाला टाळतात ?जाणुन घ्या कारणे आणि उपाय

तोंडाच्या घाणेरड्या वासामुळे आपले इंप्रेशन डाऊन होते

सकाळ डिजिटल टीम

Tips for Bad Breath : आपण नेहमी तोंड साफ ठेवतो. त्यासाठी अनेकदा महागड्या टुथपेस्ट वापरतो. पण तरी अनेक वेळा तोंडाचा घाणेरडा वास येतो. तोंडाच्या घाणेरड्या वासामुळे आपले इंप्रेशन डाऊन होते. जेव्हा कधी तोंडातून विचित्र वास येतो तेव्हा बरेच लोक तुमच्याशी बोलायलाही जवळ येत नाहीत. त्यावेळी यावर उपाय शोधले जातात.

तोंडाचा घाणेरडा वास घालवण्यासाठी फक्त महागडे माऊथवॉशच नाही तर शरीरातील पाण्याची पातळी राखण्याचीही काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊयात तोंडाचा घाणेरडा वास कशामूळे येतो आणि तो घालवण्यासाठी काय उपाय केले पाहीजेत.

का येते तोंडाला दुर्गंधी

अनेक लोकांना दातांच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामूळेही तोंडाचा जास्त वास येतो. याशिवाय काही वेगळे पदार्थ खाल्ल्यानेही तोंडाचा वास येऊ लागतो. लसूण, कच्चा कांदा खाल्ल्याने वास येतो. पोटदुखी किंवा घशाच्या समस्येमुळे अनेक वेळा तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तोंडात लाळेचं प्रमाणही कमी होतं आणि म्हणून तोंडाचा वास येतो.

तोंडाचा वास येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीचे अन्न ग्रहण करणे. अनेकजण डाएट आणि हायड्रेशनची काळजी घेत नाहीत. ते बेसुमार खात सुटतात. त्यामूळे तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. खाण्याव्यतिरिक्त इतर अनेक आजारांमुळेही तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. मधुमेह आणि किडनीच्या समस्यांमुळे तोंडातून दुर्गंधी येणे सुरू होते.

आयुर्वेदीक पावडर आणि ब्रश

तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तोंडाची नीट स्वच्छता करणे. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक पावडर वापरू शकता. सकाळी ब्रश ऐवजी कडुनिंब आणि बाभूळ यांच्या काड्या वापरू शकता. यामुळे दातही सुरक्षित राहतील आणि कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही.

बडीशेप करेल मदत

किचनमध्ये असलेली बडीशेपचा वापर करून तोंडाचा वास घालवता येऊ शकतो. बडीशेप खायची नसेल तर तूम्ही लवंगेचे सेवनही करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT