Beauty Parlour Stroke Syndrome esakal
आरोग्य

Beauty Parlour Stroke Syndrome : पार्लरमध्ये केस धुतल्याने होतो मृत्यू? जाणून घ्या

पार्लरमध्ये केस धुणे फार सामान्या बाब आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, मागे मान करून केस धुतल्याने काही लोकांच्या जीवावर बेतू शकतं.

सकाळ डिजिटल टीम

Know all about beauty parlour stroke syndrome : तुम्हालाही पार्लरला जाऊन हेअर वॉश करायला आवडतो का? हळूवारपणे डोक्यातून फिरणाऱ्या हातांनी रिलॅक्सिंग वाटतं. पण या रिलॅक्सिंग मोडमध्ये त्या चेअरवर बसल्यावर मागे मान करून मानेवर येणारा ताण गंभीर समस्या निर्माण करू शकतात. याला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हटलं जातं.

नुकतेच हैद्राबादचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी या सिंड्रोमविषयी एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, "नुकतीच एक ५० वर्ष वयाची महिला माझ्याकडे आली. तिला आळस, अशक्तपणा, मळमळ, उलट्या अशी लक्षणं दिसत होती. याची सुरूवात तिने पार्लरमध्ये हेअर वॉश करायला लागल्यापासून झाल्याचं तिनं सांगितलं. सुरूवातीला तिनं पोटाच्या डॉक्टरांना दाखवलं."

Beauty Parlour Stroke Syndrome

तिच्या लक्षणांत कोणतीही सुधारणा न झाल्याने नंतर तिला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम असल्याचं निदान झालं.

काय आहे हा सिंड्रोम

मानेवर ताण आल्याने मेंदूकडे ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्यामुळे मेंदूच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांना डॅमेज होतो. मान मागे गेल्याने बारीक व्हेन्स ज्या ऑक्सिजन वाहून नेतात त्या दाबल्या गेल्याने ऑक्सिजन पुरवठा होत नाही.

Beauty Parlour Stroke Syndrome

त्यामुळे आळस, अशक्तपणा, मळमळ, उलट्या, असंतुलन, अंधुक दिसणं अशी लक्षणं जर मागे मान करून केस धुतल्यानंतर दिसत असतील तर आत्ताच सावध व्हा. आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः न्यूरोलॉजिस्ट.

काय करावं अन् काय नाही

  • जर तुम्हाला ही लक्षणं दिसली तर पार्लरला जाणं बंद करा हा उपाय नाही. पण न्यूरोलॉजिस्टला दाखवा.

  • नियमित मानेचे व्यायाम करा.

  • सकस आहार घ्या.

  • रक्तातल्या साखरेचं प्रमाण आणि ब्लडप्रेशर तपासत रहा. त्यावर उपचार करा.

  • लक्षणांकडे दूर्लक्ष करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT