Beet Fruit sakal
आरोग्य

Beetroot Benefits : नावडते बीट आयुर्वेदिक औषध म्हणून कार्य करते फिट!

कंदमुळ बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणून उत्तम कार्य करते. बीट नियमित खाण्याने त्वचा चमकदार होते. मेंदूचे कार्य सुधारते.

गणेश कांबळे

Medical Benefits Of Beetroot- कंदमुळ बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणून उत्तम कार्य करते. बीट नियमित खाण्याने त्वचा चमकदार होते. मेंदूचे कार्य सुधारते. वजनासहित रक्तदाब कमी करण्यासाठी बीट हे कंदमुळ अत्यंत गुणकारी समजले जाते. बहूतेक जणांना बीट हे आवडत नाही. मात्र, नावडते बीट आयुर्वेदिक औषध म्हणून फीट कार्य करते.

बीट हे खाण्यासाठी चवदार तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहारात बीटचे नियमित सेवन केल्यास मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते. शिवाय त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशिअम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहण्यास मदत होते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात त्याचबरोबर जीवनसत्त्वे व खनिजे यासारखे पोषक तत्त्व भरपूर असल्याने त्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते.

वजन राहते नियंत्रित

बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या डायटमध्ये बीटचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट खाण्यामुळे वजन वाढत नाही तसेच त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

रक्त वाढीसाठी उत्तम

बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉसिक ॲसिड असते. त्यामुळे रक्त वाढीस मदत होते. रक्त वाढीसाठी दररोज एक कप घेतल्यास फायदेशीर ठरते.

रक्तदाब राहतो नियंत्रणात

बीटमध्ये नायट्रेटचेप्रमाण अधिक असते. त्यामुळे बीट खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. ब्लडप्रेशर हाय असल्यास जेवणात बीटचा वापर शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

कॅल्शियमसाठी आयुर्वेदिक औषध

बीटमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते कॅल्शिअम हा आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. बीट खाण्यामुळे कॅल्शिअमची कमतरता दूर होऊन आपली हाडे दात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

महिलांसाठी लाभदायक

कच्चे बीट खाण्यामुळे मासिकपाळी संबंधी तक्रारी दूर होण्यास मदत होते. तसेच बीटच्या सेवनाने रक्त व हिमोग्लोबिन वाढते बीटमध्ये फॉस्फिक ऍसिड असल्याने गरोदर महिलांसाठी बीट उपयुक्त ठरते.

त्याचबरोबर प्रामुख्याने बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणून काम करते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

फुफ्फुसांसाठी फायदेशीर

बीटच्या हिरव्या भाज्या फुप्फुसांच्या कार्यात आयुर्वेदिक औषध म्हणून काम करतात. तसेच श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास मदत होते. बीटमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम सारख्या फुफ्फुसाच्या आरोग्यास प्रोत्साहन देणारी जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे असल्याने त्याच्या नियमित सेवनाने आरोग्याला फायदा होतो.

डॉ. संदीप उबाळे (एम.डी.) आयुर्वेदाचार्य सांगतात, जंगली वाणाचे बीट भारताच्या किनारपट्टी भागात वापरात होते. सध्याच्या विकसित वाणाचे बीट पोर्तुगिजांची भारतात आणले असे सांगितले जाते. आयुर्वेदीय निघंटू ग्रंथांमधे बीटाचे वर्णन सापडत नाही. आयुर्वेदानुसार, बीटाचा कंदवर्गात समावेश करता येईल. सुश्रुताचार्यांनुसार कंद हे रक्तपित्तहर, शीत(थंड), मधुर(गोड), गुरू (पचनाला जड), शुक्रवर्धक, स्तन्यवृद्धीकर असतात. हेच बीटाचे गुणधर्म मानता येतील.

पचनशक्ती व्यवस्थित असल्यास बीट कृश व्यक्तींना वजन वाढवण्यासाठी आणि उष्णतेच्या विकारात उपयोगी ठरेल. बीटचा ज्यूस घेण्यापेक्षा बीट चावून खाणे चांगले. बीटाचा गाजरासारखा हलवा, भाजी किंवा पराठे बनवता येतात. तसेच बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणून उत्तम कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT