Viral Infection Sakal
आरोग्य

Viral Infection : व्हायरल झाल्यावर डॉक्टर का देतात विश्रांतीचा सल्ला; जाणून घ्या

वातावरणणात बदल झाला की, अनेकांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो.

सकाळ डिजिटल टीम

Viral Infection : वातावरणणात बदल झाला की, अनेकांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो. यामध्ये मग काहींना सर्दी, खोकला, ताप अशा आजारांना सामोरे जावे लागते.

difference between corona and flu

आजारी पडल्यानंतर आपले शरीर सुस्त होते. त्यामुळे डॉक्टर जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. मात्र, जर तुम्ही या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, त्याचा विचार करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला आजारपणात जास्तीत जास्त विश्रांती घेणे का आवश्यक आहे. याबद्दल माहिती सांगणार आहोत.

जेव्हा आपले शरीर जीवाणू, विषाणू किंवा किटाणूंशी लढत असते तेव्हा आपल्या शरीराला जास्तीत जास्त उर्जेची आवश्यकता असते. विश्रांती घेतल्याने ही ऊर्जा शरीराला मिळण्यास मदत होते.

झोपेच्या कमतरतेमुळे होणारे आजार

शरीरात संसर्ग होताच रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. झोपेमुळे तुम्ही रोगप्रतिकारक शक्तीला अधिक मदत होते. आराम केल्याने विषाणुंशी लढणारे प्रथिने सक्रीय होतात. आजारपणात आराम न केल्याने शरिरीतील ऊर्जा संपते. तुम्ही आजारी असाल आणि बेड झोपून मोबाईल पाहात असाल तरी, शरिरातील आवश्यक ऊर्जा नष्ट होते. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.

Sleeping

तुमच्या शरिराला केव्हा आवश्यक आराम गरजेचा आहे हे तुमचे शरीर अचूक जाणते. व्हायरल, बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजेच सर्दी किंवा ताप असताना आपल्याला जास्त झोप येते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रचंड झोप येते. अति झोप येते म्हणून काळजी करण्याची काहीच गरज नाही. इन्फेक्शन झाल्यानंतर अधिक झोप येणे ही सामान्य बाब आहे.

व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्ही जितकी अधिक विश्रांती घ्याल तितके लवकर तुम्ही बरे व्हाल. आजारी असताना शक्यतो सकस आहार घेण्याचा प्रयत्न करा. तसेच डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात निवडायला हवं! दिग्गज खेळाडूची मागणी; म्हणाले, तो मॅच्युअर नाही असं...

Pune News : पुणे शहराला विषाणूजन्य आजारांचा विळखा; ‘एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ

Deglur Rain : देगलूरात ढगफुटीसदृश्य पाण्याने हाहाकार; अनेक गावे जलमय शेती ही पाण्याखाली, २५ गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Live Updates : सांताक्रूझमधील अकोला पोलीस स्टेशन परिसरात साचलं पाणी

CP Radhakrishnan Meet PM Modi: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT