luffa google
आरोग्य

उन्हाळ्यात दुधीचा असा होईल उपयोग; अभिनेत्रीकडून ऐका आरोग्यविषयक फायदे

कोलेस्ट्रॉल आणि उच्च मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दुधी उपयुक्त ठरतो.

नमिता धुरी

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित राखणे गरजेचे असते. यासाठी ऋतुनुसार उपलब्ध फळे व भाज्या खाल्ल्या जातात. उन्हाळ्यात दुधी खाणे का गरजेचे आहे याबाबतची एक पोस्ट बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री दासानी हिने शेअर केली आहे.

उन्हाळा सुरू होताच आपल्याला पाण्याची जास्त गरज भासते. अशावेळी दुधीला आपल्या आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे. पाण्याची पातळीच नव्हे तर वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते, असे भाग्यश्रीने लिहिले आहे.

व्यायाम केल्यानंतर रोज दुधीचा रस प्यायल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहाते. मूत्रमार्गात संसर्ग झाला असल्यास लिंबाच्या रसात दुधीचा रस घालून खाणे हा उपाय ठरू शकतो. दुधीमध्ये ९२ टक्के पाणी आणि ८ टक्के फायबर असते. त्यामुळे मधुमेहाचा सामना करण्यासाठी दुधीची भाजी उत्तम ठरते.

२०१२-१३ साली इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार १३ भाज्यांचे रस टाइप २ मधुमेह आणि लठ्ठपणाच्या विकासाशी संबंधित एन्झाइम्सना प्रतिबंधित करतात. मुळा आणि दुधी यांनीच केवळ एन्झाइम्सचे कार्य कमी करण्यास मदत केली.

कोलेस्ट्रॉल आणि उच्च मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दुधी उपयुक्त ठरतो. दुधीमुळे शरीर थंड राहाते व अॅसिडिटी कमी होते. दुधीमुळे पचन चांगले होते व पोटाच्या समस्या दूर होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये निरोगी राहण्यासाठी दुधीच्या रसात आले, आवळा, पुदिना किंवा लिंबू वापरू शकता.

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी दुधी ही चांगली भाजी आहे. यात फॅट किंवा कॅलरी नसतात. फायबर, जीवनसत्त्वे अ, ब, क असल्याने ही भाजी अतिशय पौष्टिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT