nagpur sakal
आरोग्य

Blood donation : रक्तदान करताय तर ही काळजी घ्या...

रक्तदान करण्यापूर्वी आणि रक्तदानानंतर हे लक्षात ठेवावे, असा सल्ला रक्तदात्यांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - रक्तदानाचा समोरच्या व्यक्तीचा जीव वाचतो तसेच याचा फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार होण्यास मदत होते. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली तर आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. यामुळे रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही अनेक शंका आहेत. या शंकांचे निरसन करण्याची गरज आहे. रक्तदान करण्यापूर्वी आणि रक्तदानानंतर हे लक्षात ठेवावे, असा सल्ला रक्तदात्यांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला.

हे लक्षात ठेवा

स्वस्थ पुरुष तीन महिन्यानंतर रक्तदान करू शकतात.

स्वस्थ महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात.

रक्तदान केल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत नाही.

रक्तदान केल्यानंतर २१ दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होते.

रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धूम्रपान करू नये.

रक्तदानाच्या ४८ तासांपूर्वी मद्यपान करू नये तसे केल्यास रक्तदान करू नये.

रक्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी भरपेट खाणे गरजेचे आहे.

रक्तदानाबाबतचे गैरसमज

महिला रक्तदान करू शकत नाही.

रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो.

रक्तदान केल्याने रोगप्रतिकारशक्ती खालावते.

रक्तदान केल्याने संसर्गाचा धोका असतो.

रक्तदान केल्याने वजन कमी होते.

माणसाचे आयुर्मान घटते.

रक्तदान हेच श्रेष्ठदान हे आपण जाणतोच. पण अनेकजण मनातील काही भीतीमुळे, चुकीच्या समजामुळे त्यापासून दूर राहतात. वास्तवात रक्तदानाच्या वेळेस फक्त ३५० मिली रक्त घेतले जाते. शरीरात सुमारे ५.५ लिटर रक्त असते. रक्तदानानंतर २४ तासात ब्लड व्हॉल्युम पुन्हा रिस्टोअर होते. मधुमेही व्यक्तीदेखील औषध किंवा आहाराच्या माध्यमातून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्यास रक्तदान करू शकतात. इन्शुलिन घेत असल्यास रक्तदान करू नका.

किशोर धर्माळे, सामाजिक अधीक्षक, रक्तपेढी, मेडिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT