Blood Pressure esakal
आरोग्य

Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ‘या’ ड्रायफ्रूट्सचा समावेश केल्याने, लवकर मिळेल आराम

Blood Pressure : आजकाल लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Blood Pressure : सध्याची बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आजकाल लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तरूणाईमध्ये आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आपल्या आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही औषधांसोबत आहारावर देखील लक्ष केंद्रीत करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहारात सुक्यामेव्याचा वापर करून तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात त्या ड्रायफ्रूट्सबद्दल.

काजू

काजूमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. पोटॅशिअम आणि कमी सोडिअचे घटक काजूमध्ये आढळतात. या घटकांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे, काजूचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करा.

अक्रोड

अक्रोड खायला तर सगळ्यांनाच आवडतात. या अक्रोडमध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट्स यांसारख्या पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, अक्रोडचे सेवन करणे उच्च रक्तदाबाच्या समस्येवर प्रभावी ठरू शकते.

या व्यतिरिक्त अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत करतात.

बदाम

नियमित बदामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे, अनेक जण आहारात बदामाचा समावेश करतात. पोषकतत्वांनी समृद्ध असलेले बदाम उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत. बदाममध्ये असलेले अल्फा-टोकोफेरॉल आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रिक ठेवण्यास मदत करते.

पिस्ता

पिस्तामध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते. यासोबतच पिस्त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी देखील पिस्ता लाभदायी आहे. पिस्ता हा पोषकतत्वांनी आणि फायबरने समृद्ध असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे, तुमच्या आहारात पिस्त्याचा जरूर समावेश करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT