Bollywood Celebrities Fitness esakal
आरोग्य

Bollywood Celebrities Fitness : वयाची चाळीशी ओलांडलेले हे अभिनेते अजूनही दिसतात तरूण! वाचा त्यांचं फिटनेस सीक्रेट

आज आपण बॉलीवूड सेलिब्रिटीजचे फिटनेस सीक्रेट जाणून घेऊया

साक्षी राऊत

Bollywood Celebrities Fitness : चित्रपटांमध्ये अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना बघून त्यांच्यासारखे फिट दिसण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. त्यांचा फिटनेस बघून त्यांची डेली रूटीन काय असेल,स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते नेमके काय करत असतील असे प्रश्न अनेकांना पडतात. बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध कलाकारांबाबत बोलायचे झाल्यास अनेकांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे. मात्र त्यांचा फिटनेस अगदी विशीतल्या तरूणासारखा आहे. चला तर या बॉलीवूड सेलिब्रिटीजचे फिटनेस सीक्रेट जाणून घेऊया.

अक्षय कुमार

अक्षय कुमारचे वय ५६ वर्षे आहे. मात्र त्याच्या फिटनेसकडे बघता त्याच्या वयाचा अंदाज लागणे कठीण होते. अक्षय कुमार त्याच्या फिटनेसची योग्य काळजी घेतो. घरचे जेवण, योगा, स्वीमिंग, स्ट्रेचिंग आणि मेडिशन करणे हेच त्याचे फिटनेस सीक्रेट. अभिनेत्याला हेल्दी लाइफस्टाइल जगणे आवडते. तो संध्याकाळी ७ वाजतो जेवतो आणि ९ वाजता झोपण्याचा प्रयत्न करतो.

अनिल कपूर

अनिक कपूरचे वय ६६ वर्षे आहे. मात्र या वयातही तो स्वत:ला फिट ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्याचे फिटनेस सीक्रेट आहे रनिंग. अभिनेता रोज वर्कआउट करतो. सोबतच मीडिया रिपोर्टनुसार त्याला वर्कआउट करायलाही आवडते. अभिनेत्याच्या मते, फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी दिवसभरात तुम्ही किती साखर खाताय यावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे असते.

शाहीद कपूर

शाहीद कपूर हा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने त्याच्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता आठवड्यातून ६ दिवस वर्कआउट करतो. यात कार्डिओ एक्सरसाइज, बॉडी वेट ट्रेनिंग आणि योगा रूटीनचा समावेश आहे. शाहीद कपूर व्हेजिटेरियन डाएट फॉलो करतो.(Exercise)

आमिर खान

अभिनेत्याचे वय ५८ वर्षे आहे. तो कायमच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. त्याच्या फिटनेकडे बघून त्याच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. स्वत:ला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी आमिर खान वर्कआउट करतो तसेच त्याला हेल्दी डाएट खायला आवडतो.

हृतिक रोशन

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या फिटनेससाठी फार चर्चेत असतो. अभिनेत्याचे वय ४९ वर्षे आहे. त्याच्या फिटनेसवर अनेक तरूणी फिदा आहेत. तो त्याच्या डेली रूटीनमध्ये कार्डियो, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंग सारख्या एक्सरसाइजेसचा समावेश करून घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकी आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, १० मोटरसायकली जप्त

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT