Eye Care and Goggles esakal
आरोग्य

Eye Care and Goggles : वाढत्या उन्हात स्वस्त गॉगल्स घेणं महागात पडू शकतं...

जसा दिवस सुरू होतो गरम व्हायला सुरुवात होते, खरंतर फेब्रुवारीमध्येच उन्हाचा चटका बसतो आहे,

सकाळ डिजिटल टीम

Eye Care and Goggles : वातावरण सध्या भलतच बिघडलं आहे, पहाटे पहाटे थंड वाटतं पण जसा दिवस सुरू होतो गरम व्हायला सुरुवात होते, खरंतर फेब्रुवारीमध्येच उन्हाचा चटका बसतो आहे, आत्ताच ही परिस्थिती आहे म्हटल्यावर पुढे मे महिन्यापर्यन्त काय होईल हे सांगणे जरा कठीण आहे.

कडक उन्हाची झळ आपल्या सर्वांनाच बसू लागली आहे. या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरत असू, यामध्ये स्कार्फ, टोपी, पाण्याची बॉटल, छत्री आणि गॉगल्स या वस्तूंचा समावेश आहे.

गॉगल ही एक अशी गोष्ट आहे की जी वापरल्याने आपण सुंदरही दिसतो. पण चांगले गॉगल्स फारच महाग असतात म्हणून अनेकदा लोकं स्वस्तातले गॉगल्स घेणे पसंत करतात. पण असं करणं आपल्या डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकतं.

बाजारात अनेक स्वस्तातले गॉगल्स मिळतात. हे गॉगल्स जरी आपल्या खिश्याला परवडण्यासारखे आणि फॅशनेबल असले तरीही ते आपल्या डोळ्यांच्या दृष्टीने मात्र खूपच हानिकारक असतात. गॉगल्सचा मुख्य हेतू हा यूव्ही रे पासून डोळ्यांचे रक्षण करणे हा आहे. परंतु स्वस्तातील गॉगल्स हा उद्देश पूर्ण तर करत नाही उलट यामुळे आपल्या डोळ्यांना हानी होण्याच्या शक्यता अधिक वाढतात.

चांगल्या गुणवत्तेचे गॉगल्स डोळ्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूनेच बनवले जातात. तसेच, नंबरचे ग्लासेस आणि गॉगल्स यांचे मिश्रण करूनही चष्मे तयार केले जातात. नेत्र तज्ञांच्या मते, अनेकदा लोकं रस्त्यावरील स्वस्त गॉगल्स विकत घेतात. परंतु असे गॉगल्स डोळ्यांना अपायकारक असतात.

पण असं नक्की का?

या गॉगल्समध्ये वापरली जाणारी काच आणि फायबर तांत्रिकदृष्टया योग्य नसतात. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांवर ताण पडणे, डोकेदुखी तसेच मोतीबिंदू यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे स्वस्तातील गॉगल खरेदी न करता चांगल्या गुणवत्तेचे आणि डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन बनवलेले गॉगल वापरण्याचा सल्ला नेत्र तज्ञ देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : नशेखोर ड्रायव्हरने घेतले निष्पाप बळी ! बस-पिकअपचा भीषण अपघात, ४ दुचाकीस्वारांसह १३ ठार

Maratha Reservation: आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच; गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण, दहा वर्षे आंदोलन सुरु!

US Iran Peace Talks : अमेरिका-इराणची २१ तासांची शांती चर्चा निष्फळ; होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम

Pune News: महात्मा फुलेवाड्यात समतेचा जागर; पुण्यातील गंज पेठेत अभिवादनासाठी लोटला उत्साही जनसागर!

Feminist Indian artist Rekha Rodwittiya : स्त्रीवादी चित्रकार रेखा रोडविटिया; कलेतून घडलेली जीवनदृष्टी, शिस्त, निष्ठा आणि जबाबदारीचा प्रवास

SCROLL FOR NEXT