मालेगाव (जि. नाशिक) : पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्यातच अतिसाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळतात. नागरिकांनी अतिसार टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करत काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले.
(Take Proper care take to prevent Diarrhea)
आवर्जून स्वच्छता पाळावी
नागरिकांनी पाणी साठविण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.
पाणी साठविताना ते गाळून प्यावे.
पिण्याचे पाणी उकळवून,
थंड करून प्यावे.
पाणी नेहमी झाकून आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावे.
नेहमी गरम व ताजे अन्न खावे, उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळावेत.
अन्न झाकून ठेवावे.
शौचावरून आल्यावर, जेवण बनविण्याआधी, जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
जुलाब सुरू झाल्यास भरपूर पाणी प्यावे.
जलसंजीवनी (ओआरएस-ORS) चे द्रावण सुरू करावे.
स्तनपान करणाऱ्या बालकांचे स्तनपान सुरू ठेवावे. अ
अतिसाराचा त्रास झाल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात वा दवाखान्यात रुग्णास घेऊन जावे, असे आवाहन आयुक्त गोसावी यांनी केले आहे.
(Take Proper care take to prevent Diarrhea)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.