diabetes diet management Esakal
आरोग्य

Diabetes Diet: मधुमेह असूनही हे सेलिब्रिटी आहेत खुपच फिट, जाणून घ्या त्यांचं डाएट

आपण काही अशाच सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत. जे मधुमेह असतानाही आरोग्याची योग्य काळजी घेत ते हेल्दी आयुष्य Healthy Life जगत आहेत

Kirti Wadkar

Diabetes Diet: tडायबेटिस म्हणजेच मधुमेह Diabetes हा असा आजार आहे ज्याने सध्या देशातीलच नव्हे तर जगभरातील मोठ्या लोकसंख्येला ग्रासलं आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांमध्ये मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.

मधूमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे टाइप १. ही इन्सुलिनवर अंवलंबून असलेली डायबिटीज आहे. तर टाईप २ गैर इन्सुलिन आहे. Celebrities living with Diabates but controlling through diet

या आजारावर सध्या तरी औषध किंवा कोणताही उपचार नसून केवळ योग्य आहार आणि जीवनशैलीच्या Lifestyle मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवणं शक्य आहे.

आज आपण काही अशाच सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत. जे मधुमेह Diabetes असतानाही आरोग्याची योग्य काळजी घेत ते हेल्दी आयुष्य Healthy Life जगत आहेत. Celebrities With Diabetes

1. अमिताभ बच्चन-  बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना टाईप-2 डायबिटीस आहे. जीवनशैलीमध्ये बदल केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. असं बिग बी सांगतात. अमिताभ बच्चन त्यांच्या दिवसाची सुरुवात ज्यूस आणि हलक्या नाष्ट्याने करतात.

त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये ते हाय प्रोटीन आणि वेगवेगळ्या भाज्यांसोबत दोन पोळ्या खाणं पसंत करतात. तर रात्रीच्या भोजनामध्ये ते सूप सोबत पनीर किंवा अंड्याची भुर्जी खातात.

2. रेखा-  बॉलीवूडची दिवा रेखा यांना काही वर्षांपूर्वी मधुमेहाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी नियमित मेडिटेशन आणि एक्सरसाइज या गोष्टींचा त्यांच्या रुटीनमध्येही समावेश केला. रेखा अत्यंत साधा आहार घेण्यास प्राधान्य देतात. सलाड, भाज्या, डाळभात आणि चपाती असा साधा आहार घेणं त्या पसंत करतात. जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं त्यांना आवडत नाही. 

हे देखिल वाचा-

3. समांथा रूथ प्रभू - टॉलीवूडनंतर बॉलीवूडलाही भुरळ घालणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. मात्र 2013 साली समंथाला मधुमेहाचा त्रास सुरू झाला. 

त्यानंतर समांथाने सांगितलं की हेल्दी डाएट, नियमित एक्सरसाइज आणि वेळोवेळी डायबेटीसची तपासणी करून ती मधुमेह नियंत्रणात ठेवते.

4. सोनम कपूर अहुजा- सोनमला फॅशन आयकॉन म्हणून ओळखलं जातं. मात्र अवघ्या 17 वर्षांची असतानाच सोनमला टाईप-1 डायबिटीस असल्याचं लक्षात आलं.

सोनमने तिचा हेल्दी डाएट आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलं. फिटनेससाठी सोनम स्विमिंग पासून ते जिम आणि योगा करणं पसंत करते.

5. निक जोनस - बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा पती नीक जोनस याला वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासूनच मधुमेहाचा त्रास सुरू झाला.

मात्र निकला मधुमेह नियंत्रणात आणण्यात यश मिळालं आहे. तो त्याच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश करतो यासाठी आहारामध्ये बीफ तसंच काजू आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करतो.

6. सुधा चंद्रन- टेलिव्हजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री सुधा चंद्रन या देखील गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाशी लढा देत आहेत. असं असलं तरी हेल्दी डाएट आणि चांगल्या जीवनशैलीच्या मदतीने त्यांनी मधुमेह नियंत्रणात ठेवला आहे.

सुधा चंद्रन यांच्या मते जेवण हा जीवनातील केवळ एक हिस्सा आहे जीवन नव्हे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्या केवळ घरचं जेवणच जेवतात. जंक फूड खाणं त्या पूर्णपणे टाळतात.

७. फवाद खान-  पाकिस्तीनी अभिनेचा फवाद खानने बॉलिवूडमध्ये देखील त्याची ओळख निर्माण केली. भारतातही त्यांचे चाहते आहेत. एका मुलाखतीत फवादने सांगितले कि जेव्हा तो १७ वर्षांचा होता तेव्हा त्याला टाइप-1 डायबेटीज असल्याचं लक्षात आलं. मीडिया रिपोर्टनुसार फवादला ऑटोइम्यून डिसॉर्डरमुळे डायबेटीज झालं आहे.

या सेलिब्रिटींना मधुमेह असला तरी चांगला आहार आणि व्यायामाच्या मदतीने त्यांनी मधुमेह नियंत्रणात ठेवला आहे. मधुमेह असूनही हे सेलिब्रिटी अगदी फिट दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

BSNL ने GenZ ला दिलं सगळ्यांत मोठं गिफ्ट! 100GB डेटा अन् अनलिमिटेड कॉल; रोजचा दर फक्त 8 रुपये..संपूर्ण ऑफर एकदा बघाच

Viral Video : हनुमानांवर कमेंट करणं पडलं महागात! राजमौली यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...'मी देवावर विश्वास ठेवत नाही'

SCROLL FOR NEXT