hypertension | Tips to Control Blood Pressure google
आरोग्य

World Hypertension Day : औषधांची गरज नाही; Blood Pressure नियंत्रणात आणण्याचे ५ सोपे उपाय

अशा काही गोष्टी आज पाहू या ज्यामुळे औषधे न घेताच रक्तदाबापासून दिलासा मिळतो.

नमिता धुरी

मुंबई : येत्या १७ मे या दिवशी उच्च रक्तदाब दिवस (world hypertension day) साजरा केला जाणार आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. जगभरात १.१३ अब्ज लोकसंख्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. WHOच्या म्हणण्यानुसार ही संख्या जगभरातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे.

उच्च रक्तदाबाची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत. या आजाराची औषधे एकदा सुरू झाली की आयुष्यभर त्यापासून सुटका होत नाही. ही औषधे घेणे ही एक चिंतेची आणि कंटाळवाणी बाब असते. त्यामुळेच अशा काही गोष्टी आज पाहू या ज्यामुळे औषधे न घेताच रक्तदाबापासून दिलासा मिळतो. (Tips to Control Blood Pressure)

आहारातून सोडियम कमी करा

सोडियम हे उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे आहारातून सोडियम कमी केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारेल आणि रक्तदाब ५ ते ६ mm/Hgपर्यंत कमी होईल. रोज २ हजार ३०० मिग्रॅपर्यंत सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवा. यासाठी पाकिटबंद (processed food items) पदार्थ कमीत कमी खा आणि जेवणात मीठ घालण्याऐवजी मसाल्यांचा वापर जास्त करा.

नियमित व्यायाम

दर आठवड्याला १५० मिनिटे शारीरिक व्यायाम केल्याने रक्तदाब ५ ते ८ mm/Hgपर्यंत कमी करता येतो. चालणे, सायकल चालवणे, पोहणे, नृत्य अशा व्यायामांना प्राधान्य द्यावे. आठवड्यातून किमान दोन दिवस strength training घ्यावे.

योग्य आहार

साबुदाणे, फळे, भाज्या आणि low fat dairy products यांमुळे रक्तदाब ११ mm/Hgपर्यंत कमी करता येईल. आहारात पोटॅशिअम वाढवा. भाज्या आणि फळांमुळे मोठ्या प्रमाणावर पोटॅशिअम मिळते.

धूम्रपान सोडा

सिगारेट ओढल्यानंतर काही वेळ रक्तदाब वाढतो. धूम्रपान बंद केल्यास रक्तदाब सामान्य राहातो. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

ताण कमी करा

सर्वात आधी हे जाणून घ्या की तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीचा ताण येतो. त्यानुसार तुमच्या आयुष्यात अनावश्यक गोष्टींवर नियंत्रण मिळवा. आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. रोज काही मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घेतल्यास ताण कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT