Men Health
Men Health esakal
आरोग्य

Men Health : पुरुषांनी आवर्जून खा चिया सिड्स, वाचा चिया सिड्सचे 4 जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

Men Health : चिया सिड्समध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे डायटिशीयनसुद्धा प्रत्येक व्यक्तीला डाएटमध्ये चिया सीड्स घेण्याचा सल्ला देतात. चिया सिड्समध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. याशिवाय चिडा सिड्समध्ये फॉस्फरस, झिंक, लोह, व्हिटॅमिन बी 1 आणि अल्फा लिनोलेनिक ऍसिड यांसारखे पोषक घटक देखील आढळतात.

चिया सिड्स सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहेत. पुरुषांबाबत बोलायचे झाल्यास चिया सिड्स खाणे खूप फायदेशीर आहे. चिया सिड्स खाल्ल्याने पुरुषांच्या स्नायूंचा विकास होतो आणि हृदयविकारांपासून बचाव होतो. चला तर आज आपण चिया सिड्सचे पुरुषांना होणारे फायदे जाणून घेऊया.

चिया सिड्सचे पुरुषांना होणारे फायदे

१) हृदयरोगासाठी लाभदायक

पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत रोज चिया सिड्सचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येतो. खरं तर, चिया सिड्स अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत आहे. या सर्व पोषक घटकांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

चिया सिड्समध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, चिया सिड्स ऑक्सिडेटिव्ह तणावाची पातळी कमी करतात. जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याच्यासाठी चिया सिड्स खाणे फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच असे म्हटले जाते की हृदयविकार टाळण्यासाठी पुरुषांनी चिया सिड्स खाव्यात.

Chia Seeds Benefits

२) पुरेसे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण

ओमेगा-३ फॅटी अॅसिड हे पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. चिया सिड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत जर तुम्ही नियमितपणे चिया सीड्स खाल्ल्या तर तुमच्या शरीरात ओमेगा ३ फॅटी अॅसिडची कमतरता भासणार नाही आणि तुम्हाला निरोगी वाटेल. रोज चिया सिड्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

३) टेस्टोस्टेरॉनला बूस्ट करते

चिया सिड्समध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही रोज चिया सिड्सचे सेवन केले तर त्यामुळे स्नायूंचा जलद विकास होतो. तसेच टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी देखील वाढेल. होय, चिया बिया पुरुषांमध्ये नैसर्गिक टेस्टोस्टेरॉन बूस्टर म्हणून काम करतात. त्यामुळे हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पुरुषांनी चिया सिड्सचे सेवन करावे.

४) बॉडी बिल्डिंगसाठी फायद्याचे

आजकाल पुरुषांमध्ये बॉडी बिल्डिंगची खूप क्रेझ आहे. यासाठी ते अनेकदा ते प्रोटीन सप्लिमेंट्सची मदत घेतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आहारात बॉडी बिल्डिंगसाठी चिया सिड्सचाही समावेश करू शकता. खरं तर, 28 ग्रॅम चिया सिड्समध्ये 138 कॅलरीज आणि 11.9 ग्रॅम कार्बोहायड्रेट आढळतात. हे पोषक घटक तुमच्या स्नायूंचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. दररोज स्मूदी किंवा दुधात चिया सिड्स टाकल्याने तुमचे स्नायू जलद वाढतील.

चिया सिड्स खाणे पुरुषांसाठी फायदेशीर (Benefits) आहे, कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, खनिजे आणि फायबर जास्त असतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पुरुषांनी अशा प्रकारे चिया सिड्स खाव्यात

एक चमचा चिया सिड्स एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. या बियांचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.

तुम्ही चिया सिड्स दुधात उकळूनही खाऊ शकता. यासाठी एका ग्लास दुधात चिया सिड्स टाका आणि नंतर उकळा. यानंतर दूध गाळून प्या.

चिया सिड्स लिंबू पाण्यात मिसळूनही घेऊ शकता.

याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चिया सिड्स स्मूदी किंवा शेकमध्ये मिसळून देखील घेऊ शकता. पण तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर आहारात चिया सिड्सचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचे सल्ला घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT