Clove oil is good for men's health 
आरोग्य

पुरुषांच्या आरोग्यासाठी लवंग तेल उत्तम, आजारांपासून राहाल दूर

सकाळ डिजिटल टीम

Clove oil : हिवाळ्यामध्ये खोकला होत असेल किंवा घशामध्ये खवखव होत असेल तर घरगुती उपाय म्हणून लवंग (Clove) चघळ्याचा सल्ला दिला जातो. इतकेच नव्हे तर जेव्हा खोकला कमी कमी करण्यासाठी जेव्हा आपण घरच्या घरी काढा बनवतो तेव्हा त्यामध्य लवंग हमखास वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, पुरुषांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी (men's health problems) लवंग फायदेशीर आहे? ओन्ली माय हेल्‍थनुसार, लवंग तेल पुरुषांच्या आरोग्यासाठी टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढविण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तसेच, लवंग तेल हे स्पर्म काऊंट (Sperm Count) आणि प्रजनन क्षमता (Fertility) वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास दूर करण्यासाठी प्रभावी आहे. पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि मधूमेहावर (Diabetes) देखील लवंग तेल खूप फायदेशीर आहे. लंवग तेलामुळे इम्युनिटी बुस्ट (Immunity Boost) करण्यासाठी मदत मिळते. पुरुषांसाठी लवंगचे तेल किती फायदेशीर आहे जाणून घ्या. (Clove oil is good for men's health)

१. इनफर्टिलिटी

लवंगचे तेल लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदशीर ठरते. लवंग तेलाचा वापर केल्याने इनफर्टिलिटीची समस्या कमी होण्यासाठी खूप फायदा होतो.

2. टेस्टोस्टेरॉनची पातळीत वाढ

लवंग तेलामुळे पुरुषांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी वाढविण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. टेस्टोस्टेरोन पुरुषांमध्ये लैगिंक शक्ती वाढविण्याचे काम करतो. त्याशिवाय स्पर्म काऊंट आणि प्रजनन क्षमतेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

३. स्पर्म काऊंट वाढविण्यासाठी

लवंग तेलामध्ये कित्येक व्हिटॅमिन, फ्लेवोनोईड, एल्कलॉईट कार्बोहायड्रेट प्रोटीन मिळू शकतो जे शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी मदत करते. या शुक्राणूंची गतिशीलता सुधारण्यात देखील मदत करू शकते. याचा फायदा तुम्ही लवंगचे तेल अरोमा थेरपीच्या मदतीने घेऊ शकता.

Clove oil is good for men's health

४. व्यसनापासून मुक्त होण्यास मदत होते

व्यसनापासून मुक्त होण्यासाठी देखील लवंग तेलाची खूप मदत होऊ शकते. जर तुम्ही लवंग तेल नियमित गरम पाण्यामध्ये स्नान करताना वापरले तर ते तुमचा मेंदू शांत होता आणि सिगारेटची तल्लप कमी होते.

५.शीघ्रपतनाची समस्या दूर करा

लवंग तेल हे उष्ण असते जे रक्तातील प्रवाह चांगला सुधारण्यासाठी मदत करते. हे शरीराचे तापमान कमी करते. अशावेळी तुम्ही चिंता आणि स्ट्रेस दूर करू शकता, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा वाढण्यास मदत होते, ज्यामुळे शीघ्रपतनाची समस्या दूर होते.

६. मधूमेह नियंत्रित करते

लवंग मधूमेहासाठी अत्यंत गुणकारी असते. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी करण्यामध्ये मदत करतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू देत नाही.

७. इम्युनिटी वाढविण्यासाठी

लवंग रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. शरीरामध्ये व्हायरस, बॅक्टेरियाचे संक्रमण होऊ शकते, त्यामुळे लवंग तेल शरीरा संक्रमण आणि किटांणूपासून वाचवितो.

लवंग तेल कंबरेवर स्प्रे करू शकता, ज्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि मन शांत होते. पण जर तुम्हाला कोणत्याही आरोग्याच्या समस्या जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांसोबत संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT