Collagen Mask esakal
आरोग्य

Collagen Mask : हातापायांच्या सौंदर्यासाठी तरुणींमध्ये वाढतोय कोलेजन मास्कचा ट्रेंड

चेहऱ्याबरोबरच पाय आणि हातांची काळजी घेण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Collagen Mask Sheet For Hand Leg Beauty Care : त्वचेची निगा राखण्यासाठी हल्ली कोलॅजीन सॉक्स आणि ग्लोव्हजचा वापर करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. चेहऱ्याबरोबरच पाय आणि हातांची काळजी घेण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे. हा ट्रेंड सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोचत आहे.

सोशल मीडियाच्‍या माध्यमातून अनेक गोष्टी सहज आणि झपाट्याने व्हायरल होतात. त्यातील ‘ब्यूटी किंवा स्किनकेअर’साठी असलेल्या टिप्स व उपाय याला महिला वर्गात सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यात अलीकडे स्किनकेअर रूटीनबद्दल बोलत असताना कोलॅजीन हा शब्द अनेकदा चर्चेत असतो. याचे कारण म्हणजेच त्वचेची काळजी किंवा ‘ब्युटी केअर’ म्हटलं, की केवळ चेहऱ्याचीच काळजी सर्वाधिक प्रमाणात घेतली जाते. अशात हात आणि पायांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे हे कोलॅजीन ग्लोव्हज आणि सॉक्स यांचा वापर केला जातो.

यासाठी करतात वापर

  • हात आणि पायांची अतिरिक्त काळजी घेण्यासाठी

  • वापरायला सहज आणि सोपे असल्यामुळे वेदना होत नाहीत

  • हात आणि पायाच्या त्वचेला मॉयश्चरायझ करते

  • या पाय आणि हातमोज्यांमुळे त्वचेसह बोटांनादेखील उपयुक्त

  • हात आणि पायांची काळजी घेण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन

  • मेहनत आणि तासनतास वेळ देण्याची गरज नाही

  • हात, पाय किंवा चेहऱ्याच्या काळजीसाठी पार्लर किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही

कोलॅजीनचे महत्त्व

  • खराब झालेल्या त्वचेच्या पेशी ‘रिप्लेस व रिस्टोअर’ करण्यास उपयुक्त

  • त्वचेच्या नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्वचेची लवचिकता राखण्यात महत्त्वाची भूमिका

  • याचा त्वचेसाठी मॉयश्चरायझर म्हणून वापर फायदेशीर

  • जोपर्यंत साबण आणि पाण्याने आपण हात-पाय किंवा चेहरा धूत नाही तोपर्यंत हे त्वचेवर असते

त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी

कोलॅजीन म्हणजेच आपल्या त्वचेच्या खालच्या स्तरात असलेले प्रथिनांचे तंतू, यामुळे त्वचा लवचिक व योग्य प्रमाणात ताणलेली राहते. कोलॅजीन हे एक ‘प्रोटीन’ आहे, जे आपल्या त्वचेला रचना, आधार आणि ताकद प्रदान करते. वाढत्या वयाबरोबरच कोलॅजीनचे प्रमाण देखील कमी होण्यास सुरुवात होते. यामुळे अनेकदा ‘एजिंग इफेक्ट’ (वय वाढल्याच्या खुणा) दिसू लागतात. त्यामुळे त्वचेला तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी हे महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. यासाठी बऱ्याचदा चेहऱ्यावर कोलॅजीन मास्क वापरले किंवा कोलॅजीनयुक्त क्रीम आदींचा वापर होतो. परंतु, आता याचे पाय आणि हातातील मोजेदेखील उपलब्ध होऊ लागले आहेत.

डॉ. शिवानी कन्नडकर म्हणाल्या, कोलॅजीन म्हणजे एक प्रथिन (प्रोटीन) जे त्वचेला रचना, तन्यता (इलस्टिसिटी) आणि आधार देते. खराब किंवा जुन्या झालेल्या त्वचेच्या पेशींना बदलणे किंवा त्याचं पुनरुज्जीवित करणे; तसेच नवीन पेशींची वाढ करणे आणि त्वचेची लवचिकता राखण्यासाठी कोलॅजीन महत्त्वाचे आहे. आपल्या हाता-पायांची अतिरिक्त काळजी घेण्यासाठी हे कोलॅजीनचे ग्लोव्हज आणि सॉक्स म्हणजे पूरक पर्याय आहे. प्रामाणिकपणे, हे एक अत्यंत सोपे आणि सुलभ पर्याय आहेत. ज्याने

आपण हाता-पायांवरच्या सुरकुत्या आणि कोरडेपणा काही तासांमध्ये कमी करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT