bitter gourd for uric acid control Esakal
आरोग्य

Uric Acid समस्या दूर करण्यासाठी या प्रकारे करा कारल्याचं सेवन, सूज आणि वेदना होतील कमी

Uric Acid Control Diet: योग्य आहार आणि काही घरगुती उपाय करून यूरिक अॅसिड नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. यासाठी कारलं हा एक प्रभावी उपाय आहे.

Kirti Wadkar

Uric Acid Control Diet: बदललेली जीवनशैली Life Style चुकीचा आहार खास करून मोठ्या प्रमाणात जंक फूडचं Junk Food सेवन यामुळे अलिकडे कमी वयातच अनेकांमध्ये यूरिक अॅसिड वाढण्याची समस्या निर्माण होवू लागली आहे. Control Uric Acid through consumption of karela juice

शरीरामध्ये यूरिक अॅसिडचं Uric Acid प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, स्नायू अवघडणं तसचं किडनीच्या Kidney समस्यांसह अनेक इतर समस्या निर्माण होऊ शकतात. तसचं यूरिक अॅसिड वाढल्याने संधीवाताचा Osteoarthritis धोका देखील वाढतो.

शरीरामध्ये यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढणं ही एक प्रकारची चयापचय प्रक्रियेशी संबंधित समस्या आहे. यामध्ये तुमचं शरीर प्रोटीनमधून निघणाऱं वेस्ट प्युरीन पचवू शकतं नाही.

अशा स्थितीत हे प्युरीन हाडांमध्ये Bones दगडांच्या रूपात जमा होतं आणि त्यामुळे तुम्हाला गाउटची समस्या होऊ शकते. यूरिक ऍसिडचं प्रमाण वेळीच नियंत्रणात आणलं नाही तर काही गंभीर समस्या देखील निर्माण होवू शकता.

योग्य आहार आणि काही घरगुती उपाय करून यूरिक अॅसिड नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. यासाठी कारलं हा एक प्रभावी उपाय आहे.

आहारामध्ये कारल्याचा समावेश केल्यास यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत होऊ शकते. यूरिक अॅसिड नियंत्रणात राखण्यासाठी आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कारल्याचा समावेश करू शकता.

हे देखिल वाचा-

यूरिक अॅसिडची समस्या दूर करण्यासाठी कारलं गुणकारी

यूरिक अॅसिडची समस्या दूर करण्यासाठी कारलं अत्यंत फायदेशीर आहे. कारल्यामध्ये विटामीन सी, आयरन, कॅल्शियम, बीटा-कॅरेटीन, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी पोषक तत्व आढळतात. नियमितपणे कारल्याचं सेवन केल्यास यूरिक अॅसिडसोबतच रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

१. उकडलेलं कारलं- यूरिक ऍसिड वाढल्यास शरीरामध्ये फायबरचं प्रमाण वाढतं. उकडलेलं कारलं शरीरात डिटॉक्सीफायरचं काम करतं. यामुळे प्युरीन डिटॉक्स करण्यास मदत होते. तसंच कारल्यातील अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे सांधेदुखीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

उकडलेल्या कारल्याचं सेवन केल्याने शरीरात वाढलेलं यूरिक अॅसिड लघवीवाटे बाहेर टाकलं जातं. यामुळे यूरिक अॅसिड नियंत्रणात राहतं.

२. कारल्याचा ज्यूस- यूरिक अॅसिडची समस्या असलेल्या रुग्णांनी नियमितपणे कारल्याच्या ज्यूसचं सेवन केल्यास ही समस्या लवकर दूर होऊ शकते. कारल्याच्या ज्यूसमध्ये त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी काळंमीठ आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळावा. रोज सकाळी अर्धा ग्लास कारल्याच्या ज्यूसचं सेवन केल्यास यूरिक ऍसिड नियंत्रणात राहील.

३. कारल्याची पावडर- रोज सकाळी उठून कारल्याचा ज्यूस बनवणं शक्य नसल्यास तुम्ही कारल्याच्या पावडरचंही सेवन करू शकता. यासाठी घरच्या घरीच कारल्याची पावडर तयार करणं अगदी सोप आहे.

कारल्याचे पातळ काप करून २-३ दिवस सावलीत वाळवून घ्या. यातील बिया बाजूला काढा. त्यानंतर या स्लाइस मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर तयार करा. ही पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा. रोज सकाळी १ चमचा पावडर पाण्यासोबत घ्या.

४ कारल्याची भाजी- तुम्ही जेवणामध्ये कारल्याच्या भाजीचा समसावेश करू शकता. कारल्याच्या विविध रेसिपी ट्राय करून कारल्याचा नियमितपणे आहारामध्ये समावेश करता येईल. ज्यामुळे यूरिक अॅसिडची समस्या दूर होईल.

यूरिक अॅसिडच्या समस्या वाढून गंभिर आजार होण्यापूर्वी आहारात कारल्याचा समावेश करून यूरिक ऍसिडचं प्रमाण नियंत्रणात आणणं शक्य आहे. याशिवाय हे उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT