Corona to Omicron Dont panic Take care  sakal
आरोग्य

Corona Precaution : कोरोना, ओमिक्रॉनला घाबरू नका; अशी घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुमची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह(Corona positive) आलीय, पण घाबरू नका. मात्र, स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या. कारण, सध्या कोरोनाबाधित होणाऱ्या ९५ टक्के रुग्णांना सौम्य किंवा कोणतीच लक्षणे नाहीत. त्यामुळे पॅरासिटमॉल, क्षारयुक्त पाणी (मीठ-साखर पाणी) आणि विश्रांती ही कोरोनाबाधितांवरील उपचाराची त्रिसूत्री आहे.(Corona precaution)

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. या पार्श्‍वभूमिवर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येणाऱ्यांनी कधी काय करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन केंद्रीय आरोग्य खात्याने नव्याने केले आहे.

कोरोनाची टेस्ट कधी करावी?

  • तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करा

  • कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असल्यास

  • घरातील कोणालाचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यास

  • परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांनी

टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर काय करावे?

  • कोरोनाचे निदान झाल्यानंतर घाबरून जाऊ नका, संयम राखा

  • योग्य डॉक्टरांशी किंवा महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधा

  • तुम्हाला ताप आहे का? तो किती आहे हे पहा

  • ऑक्सिजनची पातळी कितीपर्यंत स्थिर राहते, हे तपासा

  • त्यावेळी ऑक्सिमीटरवर हृदयाचे ठोके बघा

गृह विलगीकरण (होम आयसोलेशन)

  • सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा कोणतेही लक्षण नसणाऱ्यांनी घरातच विलगीकरण व्हा

  • गृह विलगीकरण किमान सात दिवसांचे असेल

  • या दरम्यान थर्मामिटरने दिवसातून किमान तीन वेळा ताप बघा

  • ऑक्सिजनची पातळी तपासा

  • उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी फोनवरून सातत्याने संपर्कात रहा

  • फारशी लक्षणे नसल्याने पॅरासिटमॉल, क्षारयुक्त पाणी व विश्रांती ही त्रिसूत्री प्रभावी ठरते

बाहेर कधी पडायचे?

  • कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून सात दिवसांचे गृह विलगीकरण आहे

  • शेवटचे सलग तीन दिवस ताप आला नसेल तरच सात

  • दिवसांनंतर गृहविलगीकरण संपेल

  • कोरोनाची लक्षण पूर्णतः कमी होणे आवश्यक

  • ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त असली पाहिजे

  • सात दिवसांनंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही

विलगीकरण संपल्यावर काय करायचे?

  • पुढील सात दिवस रुग्णांनी स्वतःच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष द्यावे

  • घराबाहेर पडल्यावर सातत्याने मास्कचा वापर करावा

  • परत कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या

हे करा

  • उकळून गार केलेले पाणी प्या

  • लिंबूवर्गीय फळ आहारात घ्या

  • पुरेशी झोप घ्या

हे करू नका

  • विनाकारण घराबाहेर पडू नका

  • तेलकट पदार्थ खाणे टाळा

  • शिळे अन्नपदार्थ खाऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

SCROLL FOR NEXT