Covid19 Impact  esakal
आरोग्य

Covid19 Impact : संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब! कोरोना झालेल्या पुरुषांमध्ये कमी होतयं वीर्याचं प्रमाण

कोविड १९ मुळे पुरुषांच्या वीर्याच्या गुणवत्तेवर खूप वाईट परिणाम

सकाळ डिजिटल टीम

Covid19 Impact : कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एम्सने नुकत्याच केलेल्या अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एम्सच्या संशोधकांचे म्हणणे आहे की कोविड १९ मुळे पुरुषांच्या वीर्याच्या गुणवत्तेवर खूप वाईट परिणाम होत आहे. नुकत्याचं केलेल्या या संशोधनात पाटणा येथील एम्समधील कोरोनाच्या ३० रुग्णांचा समावेश आहे.

चीनमध्ये कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहे. भारतात देखील त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. पाटणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशातील मंगलगिरी येथील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात कोविड-१९ चा परिणाम पुरुषांमधील शुक्राणूंवर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. हे संशोधन ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान पाटणा एम्समध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या १९ ते ४३ वयोगटातील सुमारे ३० पुरुषांवर करण्यात आले आहे.

पहिली चाचणी कोरोना संसर्गानंतर लगेच करण्यात आली तर दुसरी चाचणी संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी करण्यात आली, ज्यामध्ये सर्व रुग्णांचे वीर्य गोळा करण्यात आले होते. पहिल्या नमुन्यात या सर्व रुग्णांच्या वीर्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे आढळून आले तर दुसऱ्या नमुन्याचा निकाल आणखी वाईट होता.

संशोधनात असे दिसून आले की १० आठवड्यांनंतरही १० टक्के पुरुषांपैकी ३० टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होती. वीर्य विश्लेषणामध्ये शुक्राणूंचे तीन मुख्य घटक मोजले जातात, ते म्हणजे शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंचा आकार आणि शुक्राणूंची गतिशीलता...

क्युरियस जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे सांगण्यात आले की पहिल्या वीर्य नमुन्यात ३० पैकी ४० टक्के (१२) पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे आढळून आले. अडीच महिन्यांनंतरही, चाचण्यांमध्ये ३ (१०%) पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे दिसून आले.अभ्यासात असे आढळून आले की ३० पैकी १० (३३%) पुरुषांचे वीर्य पहिल्या वीर्य नमुन्यात १.५ मिलीपेक्षा कमी होते. साधारणपणे १.५ ते ५ मिली असायला हवे

यासह, पहिल्या वीर्य नमुन्यात, संशोधनात भाग घेतलेल्या ३० पुरुषांपैकी २६ पुरुषांच्या वीर्याची जाडी, २९ पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि २२ पुरुषांच्या शुक्राणूंच्या हालचालीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या चाचणीमध्ये स्थिती सुधारली, जरी दुसऱ्या वीर्य नमुन्यादरम्यान हे पॅरामीटर सुधारले असते तरी संशोधकांचे म्हणणे आहे की ते अजूनही सामान्यपेक्षा खूपच कमी आहे.

या संशोधनाचे प्रमुख डॉ. सतीश पी दीपंकर यांनी आदेश दिले आहेत की सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) क्लिनिक आणि शुक्राणू बँकांनी कोविड-१९ ग्रस्त पुरुषांच्या वीर्यांचे मूल्यांकन करावे . वीर्याचा दर्जा सामान्य होईपर्यंत हे संशोधन चालू ठेवावे.

सीड्स ऑफ इनोसेन्स आयव्हीएफ सेंटरच्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल म्हणाल्या, कोविड १९ मुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी झाल्याबद्दल जगभरात संशोधन केले जात आहेत. यासोबतच या सर्व अभ्यासाचा डेटाबेसही तयार करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT