Dengue Symptoms In Child esakal
आरोग्य

Dengue Symptoms In Child : डेंगीची लक्षणे लहान मुलांमध्‍ये वेगळी, वेळीच ओळखून व्हा सावध

लहान मुलांमध्ये डेंग्यूचे विविध प्रकार दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Dengue Symptoms In Children : सध्या डेंगीचा आजार सर्वत्र वाढत असून लहान मुलांना यापासून वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. डेंग्यूमुळे रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. काही प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यूही होतो. लहान मुलांमध्ये डेंग्यूचे विविध प्रकार दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

काही मुलांमध्ये डी-२ स्ट्रेनची प्रकरणेही नोंदवली जात आहेत. अशावेळी मुलांमध्ये या रोगाची लक्षणे वेळेवर ओळखणे महत्वाचे आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे प्रौढांपेक्षा काहीशी वेगळी असतात.

काय आहे डी-२ स्ट्रेन

डेंग्यूचा संसर्ग एडिस डासांच्या चावण्याने होतो. डेंग्यूच्या डी-२ स्ट्रेनची प्रकरणे देखील आढळतात. डी-२ हा डेंग्यूचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यूही होतो. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे गंभीर असू शकतात. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे काय आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

उच्च ताप

लहान मुलांमध्ये डेंग्यू झाल्यास खूप जास्त ताप येतो. ताप १०० अंशांपेक्षा जास्त असतो आणि या काळात पोटात तीव्र वेदना होऊ शकतात.

नाकातून रक्तस्त्राव

तापासोबतच मुलाच्या नाकातून रक्त येत असेल, तर ते डेंग्यूचे धोकादायक लक्षण आहे. अशा परिस्थितीत मुलाला ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे.

उलट्या आणि अतिसार

या ऋतूत होणारे उलट्या आणि जुलाब हे देखील डेंग्यूचे लक्षण असू शकते. तापासोबत हा त्रास होत असेल, तर ताबडतोब मुलाला डॉक्टरांकडे न्यावे व लवकर उपचार करून रुग्णाला अधिक काळ आराम करू द्यावा.

तापात बेफिकीर राहू नका

याबाबत तज्ज्ञ सांगतात की या ऋतूमध्ये ताप आल्यास काळजी करू नये. हा ताप डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉइड असू शकतो. अशा स्थितीत जर मुलाला ताप आला असेल आणि त्याला दोन दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला असेल, तर त्याची डेंग्यू किंवा मलेरियाची त्वरित तपासणी करा. या प्रकरणात स्वत: उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. चाचणीत डेंग्यूची पुष्टी झाल्यास ताबडतोब रुग्णालयात जावे.

असा करा बचाव..

मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला

घरात पाणी साचू देऊ नका

रात्री मच्छरदाणी वापरा

ताप आल्यास तपासणी करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT