Depression Effects esakal
आरोग्य

Depression Effects : नैराश्यातून जाणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञ सांगतात...

नैराश्याने ग्रस्त किंवा असंतुलित मानसिक आरोग्य असलेल्या तरुणांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका जास्त असतो

सकाळ ऑनलाईन टीम

Depression Effects : नैराश्याच्या समस्येशी झुंजणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा धोका अधिक असू शकतो. एका नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, नैराश्याने ग्रासलेल्या तरुणांचे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. अभ्यासानुसार, नैराश्याने ग्रस्त किंवा असंतुलित मानसिक आरोग्य असलेल्या तरुणांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका जास्त असतो.

जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात 18 ते 49 वयोगटातील 5 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. हा अभ्यास 'जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन'मध्ये प्रकाशित झाला आहे. तरुण आणि मध्यम वयाच्या लोकांमध्ये हृदयविकार आणि नैराश्य यांचा संबंध असल्याचे असल्याचे दिसून येते.

नैराश्य आणि हृदयविकाराचा काय संबंध आहे?

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, अभ्यासात असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही तणावाखाली असता किंवा चिंता आणि नैराश्याने ग्रासलेले असता तेव्हा तुमच्या आत अनेक भावना निर्माण होतात, ज्यामुळे तुमच्या हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. या अभ्यासाच्या लेखिका गरिमा शर्मा यांनी सांगितले की, हे सामान्य आहे की निराश वाटल्यामुळे, आपण धूम्रपान, दारू पिणे, कमी झोपणे आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय राहणे यासारख्या वाईट सवयींच्या आहारी जाऊ शकतो. या सर्व सवयी तुमच्या हृदयावर वाईट परिणाम करत असते. (Lifestyle)

नैराश्यास कोणते घटक प्रभावित करतात?

अभ्यासानुसार, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, जास्त वजन किंवा लठ्ठपणा, धूम्रपान, मधुमेह, खराब जीवनशैली आणि डाएट यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हे सर्व घटक एकप्रकारे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT